विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/12/2025 :
मित्र परिवार संख्येने वाढविण्यापेक्षा गुणवत्तेने वाढवा. मित्र किती आहेत त्यापेक्षा कसे आहेत हे जास्त महत्वाचे. लांबून मजा पाहणारे, स्वार्थापुरते जवळ येणारे मित्र नसतील तरी चालतील.
तुम्ही जसजसे मोठे व्हाल तशा गरजा बदलतात. काही सवयी बिघडतात. व्यसने करणारे मित्र शक्यतो जवळ करू नका. काही गोष्टी संगतीमुळे बिघडतात. नसलेल्या सवयी लागतात.
मुलांनो, अडचणीत उपयोगी पडणारे, न सांगता मनातील ओळखणारे व न बोलावता धावत येणारे मित्र म्हणजे आयुष्याची कमाई असते. आपल्या गैरहजेरीत आपल्या आई-वडिलांसाठी मुलाप्रमाणे उभे राहणारे मित्र खरे मित्र.
संकट काळी उपयोगी पडतील तेच खरे मित्र!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या