🔵 अकलूज नगरपरिषदेच्या चाव्या मोहिते पाटील यांच्याच हातात
🟠 नगराध्यक्षासह महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या 2 नगरसेवका सह 23 नगरसेवक विजयी तर भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवक विजयी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 21/12/2025 : अकलूज ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपरिषद मध्ये झाल्यानंतर प्रथमच अकलूज नगर परिषदेची निवडणूक चुरशीची झाली. त्यामध्ये नगराध्यक्षासह महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या 2 नगरसेवका सह 23 नगरसेवक विजयी होऊन सुजान मतदारांनी अकलूज नगरपरिषदेच्या चाव्या मोहिते पाटील यांच्याच हातात दिल्या. पॅनल टू पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस श. प., भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अ.प., वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र विकास सेना, काँग्रेस या पक्षाच्य उमेदवारानी निवडणूक लढवली. आणि नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस श.प. च्या, रेश्मा लालासाहेब आडगळे, भारतीय जनता पार्टीच्या पूजा कोतमिरे, महाराष्ट्र विकास सेनेच्या- सुवर्णा साठे, वंचित बहुजन आघाडीच्या -उषा सुनील कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस अ. प. च्या दिव्यानी रास्ते, या निवडणूक रिंगणात होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस श. प.च्या उमेदवार रेश्मा लालासाहेब आडगळे या विजयी झाल्या. या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या 26 जागा होत्या. ज्यामध्ये नगराध्यक्ष व 20 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस श.प.चे निवडून आले. आणि भारतीय जनता पार्टीचे ४ उमेदवार निवडून आले. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीतून मित्र पक्ष म्हणून 2 जागा मिळाल्या होत्या निवडणूक रिंगणात ते दोन्हीही उमेदवार विजयी झाले. मतदारांनी मोहिते पाटील यांचेवर विश्वास ठेवून घवघवीत यश प्राप्त करून दिले अकलूज आणि मोहिते पाटील हे समीकरण आजतागायत टिकून असल्याचे मतदाराने सर्वांना दाखवून दिले. निवडणूक काळात मोहिते पाटील यांच्यावर बऱ्याचश्या टीका टिपण्या झाल्या त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा आरोप झाला मात्र अकलूज मध्ये मोहिते पाटलाची दहशत नाही हे नागरिकांनी मतदानाच्या रूपाने दाखवून दिले असल्याचे नगराध्यक्ष पदाच्या निवडून आलेल्या उमेदवार रेश्मा लालासाहेब आडगळे यांनी म्हटले आहे.
या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश प्राप्त झाल्याबद्दल जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवतेजसिंह मोहिते पाटील, संग्राम सिंह मोहिते पाटील सयाजी राजे मोहिते पाटील किशोरसिंह माने पाटील , क्रांतिसिंह माने पाटील इत्यादी मोहिते पाटील आणि माने पाटील परिवाराने अकलूज पंचक्रोशीतील मतदारांचे शतशः आभार मानले.
अकलूज नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
नगराध्यक्ष --रेश्मा लालासाहेब आडगळे राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१) युवराज दोरकर -राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१ वैशाली भोसले -राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
२ प्रियंका लखन गायकवाड- राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
२ सचिन देशमुख--राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
३ विशाल मोरे- राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
३ नम्रता राहुल जगताप --राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
४ मोहसीन बाबू शेख -राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
४ मंदाकिनी पाटोळे--राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
५ रेशमा इकबाल तांबोळी-राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
५ सयाजी राजे मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
६ उज्वला विटकर शिवसेना उ.बा. ठा.
६ पृथ्वीराज अंबुरे शिवसेना उ. बा. ठा.
७ मृदुला महेश सूर्यवंशी--राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
७ क्रांतिसिंह माने पाटील --राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
८ दिपाली संतोष वाघमोडे --भाजपा
८ महेश शिंदे ---भाजपा
९ राहुल लोंढे-- भाजपा
९ प्रतिभा विलासानंद गायकवाड-- राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१० मनीषा मोहन तिकोटे-- राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१० विलास गणपत क्षिरसागर-- राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
११ नाशिकराव सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
११ शितल परशुराम बंदपट्टे --राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१२ स्वाती फुले --राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१२ शिवतेजसिंह मोहिते पाटील-- राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१३ नामदेवराव गलांडे-- राष्ट्रवादी काँग्रेस श.प.
१३ जयश्री एकतपुरे --भाजपा

0 टिप्पण्या