मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 17/12/2025 : जिभेवर ताबा ठेवा असे आपल्याला लहानपणापासून ऐकायला मिळाले. त्यावेळेस म्हणजे काय ते समजत नव्हते.  पण आता लक्षात येते खाणे अन् बोलणे दोन्हीवर सुद्धा आपले नियंत्रण हवे.

जीभ चवीसाठी अधाशी असते. चांगल्या चवीचे, मसालेदार, चमचमीत, तळलेले वगैरे पदार्थ खायला छान वाटतात. जीभ तृप्त होते. अर्थात त्यांचा अतिरेक झाला तर शरीराला दुष्परिणाम भोगावे लागतात.

हिच परिस्थिती बोलण्याची. जीभ हलल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. जास्त नको इतके बोलतो म्हणजे जीभ हलते. तिचे जास्तीचे हलणे आपल्या अंगलट येऊ शकते. त्यामुळे इथे पण जिभेवर नियंत्रण हवे.

आजचा संकल्प

अती खाणे किंवा अती बोलणे दोनही गोष्टी शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत हे लक्षात घेऊ व जिभेचा योग्य प्रमाणात वापर करू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या