🟡 शेळ्या मेंढ्यासाठी पशुवैद्यकीय सेवा मोफत करावी; यशवंत क्रांती चे पंकजा मुंडेंना निवेदन 🔷संजय वाघमोडे यांची माहिती

🟡 शेळ्या मेंढ्यासाठी पशुवैद्यकीय सेवा मोफत करावी; यशवंत क्रांती चे पंकजा मुंडेंना निवेदन

🔷संजय वाघमोडे यांची माहिती 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 04/11/2025 :

मुंबई येथे  राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची  त्यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी तसेच मंत्रालयात  निवृत्ती रा. मराळे(अवर सचिव, पशुसंवर्धन तथा संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ) यांची यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यपाल नियुक्त  मेंढपाळ चराई व कुरण समितीचे सदस्य संजय वाघमोडे यांनी भेट घेऊन शेळ्या मेंढपाळ यांच्या प्रश्नांवर चर्चा करून प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. प्रामुख्याने पशुवैद्यकांचे शेतकऱ्यांच्या दारात भेटीचे दर कमी करुन शेळ्या मेंढ्यासाठी मोफत उपचार करावे. तसेच कोल्हापूरी दख्खन मेंढीचे संर्वधन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे प्रक्षेत्र कार्यालय कोल्हापूरात स्थापन करण्याबाबत चर्चा केली. नाम. पंकजा मुंडे यांनी याबाबत सविस्तर चर्चा करून लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. 

      यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि शेतकऱ्यांच्या दारात भेट देण्यासाठी वैद्यकीय व शल्य चिकित्सा विषयक प्रकरण हाताळण्यासाठी पशुवैद्यकाच्या भेटीच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. हि वाढ शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारी आहे.या वाढीव सेवाशुल्क मुळे अगोदरच नैसर्गिक संकटांनी हैराण झालेले शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत. 

      शेतकरी हा शेतीस पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन करीत असतात. भूमिहीन शेतकऱ्याचा संसारच पशुपालनावर अवलंबून असतो.  आर्थिक चणचणीमुळे  शेळ्या मेंढ्यांच्या वर उपचार करणे  हे सर्वसामान्य शेतकरी, मेंढपाळ यांना शक्य होत नाही उपचाराचा खर्च जास्त होत असल्याने शेतकरी मेंढपाळ उपचार करत नाहीत त्यामुळे पाळीव जनावर, शेळ्या मेंढ्यांच्या मध्ये रोगराईत वाढ होऊन शेळ्या मेंढ्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

         शेळ्या मेंढ्याचे पालन करणे हा धनगर समाजाचा पारंपारिक व्यवसाय आहे व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. या राज्यातील शेळ्या मेंढ्यांची संख्या झपाट्याने कमी होऊन मटणाचा मागणी तसा पुरवठा होत नसल्याने  राज्यातील मटणाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत याचे कारण म्हणजे धनगर समाजातील जे मेंढपाळ आहेत ते आपल्या शेळ्या मेंढ्या विकून मोलमजुरी करणे पसंत करत आहेत. मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपावर नेहमीच रानावनात भटकंती करत असतो. त्यामुळे त्याच्याकडे पैसे नसल्याने त्यांना आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या वरती उपचार करणे हे शक्य होत नाही. तरी पशुवैद्यकीय वैद्यकांच्या भेटीचे उपचाराचे दर कमी करून शेळ्या मेंढ्यांच्या साठी उपचार हे पूर्णपणे निशुल्क करण्यात यावेत.अशी मागणी ही प्रामुख्याने करण्यात आली आहे. 

     शेतकऱ्यांच्या दारात भेट देण्यासाठी वैद्यकीय व शल्यचिकित्सा पशुवैद्यक भेटीचे दर...

       औषधोपचार करणेसाठी नगरपालिका व ग्रामीण भागात दिवसा १५० रू. व रात्री २५० रूपये

महापालिका क्षेत्रात २५०रुपये व रात्री ३५० रु. इतर चार्जेस व शासनाचे सेवा शुल्क अतिरिक्त द्यावे लागते. इतरही दिल्या जाणाऱ्या सेवांचे दर अनेक पटींनी वाढविले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या