एकलव्य

 


एकलव्य


अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 04/11/2025 :


गुणवत्तेच्या बाबतीत म्हणाल  

सचिनपेक्षाही नव्हता कमी 

भारताच्या संघासोबत मात्र

नाही लागली कधीच रमी ll


नियतीने बहुधा त्याचा 

अंगठा कापून घेतला होता 

सटवाईने मात्र ललाटी

वेगळाच लेख लिहिला होता ll


एकही चेंडू न खेळता

काल त्याने चषक जिंकला 

जणु आधुनिक एकलव्याला 

नशिबानेच न्याय दिला ll


कालचा चषक जिंकणाऱ्या 

सगळ्या यशस्वी महिलांमागे 

त्याचा वाटा अनमोल होता

त्यांना सक्षम करण्यामागे ll


असा गुरू लाभायलाही

नशीब नव्हे भाग्य लागतं

असं भाग्य नशिबी येताच

यश अजून काय मागतं ?


कालच्या विश्वविजयाचा 

तोच तर खरा शिल्पकार 

वनवास भोगून राज्यपदी 

विराज अमोल मुजुमदार ll


AK ( काव्यानंद ) मराठे

कुर्धे,पावस,रत्नागिरी

9405751698

चित्रकाव्य क्र.

 2️⃣2️⃣8️⃣9️⃣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या