भाळवणीतील कीर्ती महामुनी हिची इन्फोसिस कंपनीत निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/11/2025 :
भाळवणी (तालुका पंढरपूर) येथील कीर्ती प्रकाश महामुनी हिची इन्फोसिस कंपनीत निवड झाली आहे. त्याबद्दल किर्ती महामुनी हिचा शाल, हार,पेढे वाटून सत्कार डॉ.नवनाथ खांडेकर,राहुल ताटे देशमुख व प्रशांत माळवदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ.नवनाथ खांडेकर म्हणाले की, इन्फोसिस कंपनीत सहज नोकरी मिळत नाही. कीर्तीने खूप मेहनत घेतल्यामुळे या कंपनीत नोकरी मिळाली आहे.त्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
राहुल ताटे म्हणाले की कीर्तीच्या घरातील कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून वडिलांचे छत्र नसूनही अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कीर्तीच्या या पुढील वाटचालीस ताटे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी किर्ती महामुनी म्हणाली की माझ्या शिक्षणाची सर्व जबाबदारी माझ्या आईने पूर्ण केली आहे.वडील नसताना ही आईने कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही त्यामुळेच मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले यापुढील काळात आई व सर्व गुरुजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहील.
यावेळी प्राची माळवदे,ज्योती महामुनी आदि उपस्थित होते.यावेळी प्रसाद महामुनी यांनी आभार मानले.
किर्ती महामुनी हिचे पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली, इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी, शासकीय महाविद्यालय कराड येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले.

0 टिप्पण्या