बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय साळुंके यांचा सत्कार संपन्न

शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय साळुंके यांचा सत्कार संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 13/10/2025 : बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस पूर्व संध्येला  सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केलेल्या सभेनंतर अत्यंत साधेपणाने संपन्न झालेल्या या समारंभास माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे आणि जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या