माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते गिरीष शेटे व अमित कारंडे यांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/10/2025 :
विधान परिषदेचे माजी आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष रामहरी रुपनवर यांच्या नातेपुते येथील निवासस्थानी माळशिरस तालुक्याचे नूतन तालुका अध्यक्ष गिरीश शेटे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश जनरल सेक्रेटरी ॲड. अमित कारंडे यांनी सदिच्छा भेट दिली तेव्हा त्यांच्या समवेत भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे हे ही होते.
याप्रसंगी माजी आमदार तसेच प्रदेश उपाध्यक्ष रामहरी रुपनवर यांनी गिरीष शेटे व अमित कारंडे यांचा सत्कार केला तसेच तालुक्याच्या कार्यकारणी संदर्भात व संघटन बांधणीच्या संदर्भात जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात चर्चा करण्यात आली व संघटना मजबूत करण्यास शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस डॉ. आदिनाथ रुपनवर उपस्थित होते.



0 टिप्पण्या