🟪माळशिरस तालुक्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
💢 माळशिरस तालुका नूतन अध्यक्षांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 02/10/2025 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती माळशिरस तालुक्यात सर्वत्र साजरी करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या वतीने नूतन तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांच्या हस्ते गांधी चौक अकलूज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रीय पिछडा वर्ग, अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, तसेच काँग्रेसचे मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी गांधी चौक अकलूज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेटे व्यापारी संकुल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून मिटींगला सुरुवात करण्यात आली.
तत्पूर्वी टिपलेल्या छायाचित्रात काँग्रेस पक्षाचे नूतन माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर, राष्ट्रीय पिछडा वर्ग, अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे व काँग्रेसचे उपस्थित मान्यवर कार्यकर्ते
💢 माळशिरस तालुका नूतन अध्यक्षांचा सत्कार
अकलूज येथील गिरीश प्रभाकर शेटे यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्ताने शेटे व्यापारी संकुल अकलूज येथे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी टिपलेल्या छायाचित्रात सेवाज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष जुल्कर शेख,Talk18 मराठीचे मुख्य संपादक आण्णा भोसले,टाइम्स9 चे अकलूज शहर प्रतिनिधी अमीर मोहोळकर, क्रांतिवीर न्यूज मराठीचे मुख्य संपादक तुषार केंगार, वाजिद सय्यद
वेळापूर येथील काँग्रेस पक्षाचे माजी कार्यकर्ते गोपाळ गजानन घार्गे यांनी काँग्रेस पक्षाचे नूतन तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचा सत्कार केला त्याप्रसंगी टिपलेले छायाचित्र.





0 टिप्पण्या