शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुखपदी मारुतीभाऊ अंबुरे यांची निवड

 


शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुखपदी मारुतीभाऊ अंबुरे यांची निवड 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 09/09/2025 : ठाकरे गटाच्या शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुखपदी मारुती भाऊ अंबुरे यांची निवड झाल्याबद्दल अण्णासाहेब शिंदे यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. 

यापूर्वी त्यांच्याकडे सोलापूर जिल्हा जोशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद आहे त्यात भर म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे तालुका प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. अंबुरे हे पूर्वीपासूनचे कट्टर शिवसैनिक मानले जातात त्यामुळे तालुक्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नियुक्ती बद्दल त्यांचा सत्कार करताना अण्णासाहेब शिंदे माजी सरपंच ग्रामपंचायत बिजवडी संग्राम भोसले  माजी उपसरपंच माळीनगर ग्रामपंचायत बबन काटकर इत्यादी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या