⭕अमेरिकेचा हालचाली भारताला सतर्क करत आहेत राष्ट्रप्रथम हीच भावना जागृत करायला लागेल 🔵 सावधान 🔵

 ⭕अमेरिकेचा हालचाली भारताला सतर्क करत आहेत राष्ट्रप्रथम हीच भावना जागृत करायला लागेल

                  🔵 सावधान 🔵 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 10/09/2025 :

भारताच्या आसपास असणारी निरनिराळ्या देशांची सरकारे अचानक दोन ते तीन दिवसांच्या  अंदोलनानंतर कोसळून पडत आहेत . श्रीलंकेचे सरकार कोसळले ,नंतर सीरियाचे सरकार कोसळले, त्यानंतर बांगलादेशचे सरकार कोसळले ,त्यानंतर आज नेपाळच सरकार कोसळले . 

        त्याआधी परवा जपानच्या पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची घोषणा केली व आज तो मंजुर सुद्धा झाला .

     ज्या घटना पूर्वी घडण्यासाठी तीन तीन चार चार वर्ष लागत असत, त्या घटना आता अतिशय थोड्या काळात घडत आहेत व त्यामुळे निश्चितच या गोष्टी सामान्य नाहीत हे लक्षात घ्यावे .

     SCo समेट चीनमध्ये झाल्यानंतर दोन सरकारे कोसळली . त्यावेळेला मी लिहिलेल्या लेखात सांगितले होते की एस सी ओ समेट नंतर अमेरिका नक्कीच काही ना काही गडबड   केल्याशिवाय राहणार नाही आणि घडलेही तसेच .

       या सर्व ठिकाणची क्रोनालॉजी लक्षात घेतल्यावर ध्यानात येते की अचानक दंगली घडतात पोलीस व लष्कर काही करू शकत नाही . त्यांच्या पंतप्रधानांची ,मंत्र्याची घरे जाळली जातात, पार्लमेंट जाळले जाते ,न्यायालयांवर हल्ला होतो . सरकारी ऑफिसेसही जाळली जातात .तेथे येणारी सरकार ही अमेरिकेच्या हातातील पपेट असतात .हे जसं वरवर दिसतं तसं नक्कीच साधे सुधे नाही .

     जपानी पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर लगेचच तीन दिवसात त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले .

       नेपाळच्या पंतप्रधानांबद्दल आपल्याला सहानुभूती असण्याचं कारण नाही .ते कम्यूनिष्ट सरकार होत व चीनच्या तालावर नाचणारे होते .पण ज्या तऱ्हेने ते पाडण्यात आले ते निश्चितच चांगले नाही .तिथल्या एका माजी पंतप्रधानला (वय ८० ) बेदम मारहाण करण्यात आली .तर दुसऱ्या पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आले .या संपूर्ण नरसंहारात कितीजण मेले असतील ते सांगता येत नाही .

       या पुढची पाळी पाकिस्तान वर येणार आहे . कारण त्यांचे पंतप्रधान हे सुद्धा sco समेटला चीन मध्ये गेले होते . लवकरच तेथेही गडबड होऊन अमेरिकेचे पपेट सरकार तेथे स्थानापन्न होईल .

      भारताच्या आसपास असणाऱ्या देशातील सर्व सरकारे आपल्या ताब्यात ठेवण्याची ही चाल अमेरिकेने खेळलेली आहे .  ती भारतावर दडपण आणून अमेरिकेचे मांडलिकत्व भारताने स्वीकारावे यासाठी म्हणून या देशांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत .

       अर्थात अमेरिका केवळ भारताकडेच वाईट नजरेने पाहते आहे असे नाही .तर त्यांचे रशिया, चीन, ब्राझील, साऊथ आफ्रिका या देशाविरुद्ध सुद्धा निरनिराळ्या खेळ्या खेळण चालू आहे .

      चीनही शांत बसला नसून त्याने आपले हेर वॉशिंग्टन मध्ये घुसवले व तिथल्या काँग्रेसच्या एका सदस्या करवी अमेरिकन सिस्टीम मध्ये त्यांनी एन्ट्री करून सर्व सिस्टीम हॅक केली . आज अमेरिका मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करून याविरुद्ध उपाय योजना करत आहे .

      अमेरिका युरोपियन देशांबरोबर सुद्धा चांगले संबंध ठेवून नाही . पण युरोपियन देशांना पर्याय नसल्याने अमेरिकेच्या मागे इच्छा नसताना सुद्धा ते जात आहेत . त्याचा परिणाम म्हणून युरोपियन युनियन मध्ये उद्या फूट पडल्याचे तुम्ही पाहणार आहात .

      ट्रम्प हे काय करतील हे सांगता येत नाही . त्यांनी व्हेनेझुएला या देशाबरोबर एक प्रकारचं युद्धच पुकारल आहे  व हे युद्ध केव्हाही सुरू होऊ शकेल अशी परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे . चीनी अमेरिकेला धमकी दिली आहे की जर त्यांनी व्हेनेझुएला वर आक्रमण केले तर आम्ही अमेरिकेच्या विरोधात उतरू .

     त्यात भर म्हणून की काय तुर्कीये या देशाने सायप्रस विरुद्ध  एक लाख सैन्य उभे करण्याचे ठरवले आहे . ज्या क्षणी अमेरिका दुसऱ्या युद्धात गुंतेल त्याच क्षणी तुर्कीये सायप्रस वर हल्ला करून आपला स्वार्थ साधल्याशिवाय राहणार नाही .

      इसराइल ने ही नुकतेच यमन या देशाच्या राजधानीवर बॉम्ब हल्ला केला . कॅबिनेट मंत्र्यांची बैठक चालू असताना हा हल्ला झाल्यामुळे तेथील पंतप्रधानासकट 12 मंत्री या हल्ल्यात मारले गेले .

      यमेन व इराणने या विरोधात सूड उगवण्याचे घोषित केले आहे .अमेरिकेची फूस असल्याशिवाय इसराइल असे हल्ले करू शकत नाही .

       तिकडे अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत .अमेरिकेची अर्थव्यवस्था ही दिवसे गणिक वाईट होत चाललेली आहे . आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी अमेरिका नेहमीच जो खेळ खेळते तो म्हणजे युद्ध खेळणे व पेटवणे . आज तर ट्रम्प सारखी व्यक्ती त्यांच्या देशाची प्रमुख असल्याने कुठल्या क्षणी ते काय करतील हे सांगता येत नाही .

     भारतावर दडपण आणण्यासाठी त्यांनी अमेरिका व ऑस्ट्रेलिया मधील अंग्लो सेक्सीयन समाजातर्फे भारतीयांच्या विरोधात एक चळवळ सुरू केली आहे , इंडियन्स गो बॅक या घोषणा दिल्या जात आहेत . ही चळवळ पुढे जाऊन भारताला खूप त्रासदायक ठरणार आहे .

      अमेरिके विरोधात नेपाळने अमेरिकेची सोशल मीडिया बंद करण्याचा डाव टाकला . तो म्हटला तर योग्य होता .कारण अमेरिका कुठल्याही क्षणी या सोशल मीडिया बंद करून तुमचा देश कठीण परिस्थितीत नेऊन ठेवू शकते . नेपाळचा हा डाव फसला व अमेरिकेने तेथील सरकार उलथवले . लक्षात ठेवा

ही परिस्थिती अमेरिका उद्या भारतातही आणू शकते .भारताकडे सुद्धा फार जास्त काळ राहिलेला नाही .अजून पर्यंत अमेरिकेने खेळलेल्या साऱ्या खेळ्या या मोदींनी हाणून पाडलेल्या आहेत . पण त्यामुळे या पुढच्या काळात अमेरिका कुठल्याही स्तराला जाऊन भारतामध्ये अनागोंदी निर्माण करू शकते हे विसरू नका . सारे केवळ मोदींवर सोपावून चालणार नाही . कारण हा राजकीय लढा नाही . अमेरिकेसारख्या सुपर पॉवर बरोबर लढाई आहे हे विसरू नका .

       आज संपूर्ण भारत यूपीआय वर अवलंबून आहे . भाजीवाल्यापासून ते मोठमोठ्या दुकानां पर्यंत सर्वत्र यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट होते . तसेच सोशल मीडिया व अन्य सर्व सेवा इंटरनेटवर अवलंबून आहेत . आणि ज्यावेळेस माणसं डेस्परेट होतात त्यावेळेस ते काहीही करू शकतात हे लक्षात ठेवा .ट्रम्प हे असेच डेस्परेट झाले आहेत आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांपुढेच व जगापुढे एक वाईट काळ येऊन ठेपला आहे . त्यामुळे आपण सावध राहणे आवश्यक आहे .

      नुकतेच येमेन  या देशाच्या जवळ असणाऱ्या लाल समुद्रातून इंटरनेटच्या केबल जातात, त्या तोडण्याचे काम येमेनने केले आहे व हे असेच मोठ्या प्रमाणावर येमेनने केले तर भारतामध्ये इंटरनेट बंद होऊ शकते .

       जगात बुद्धिबळाचा डाव टाकला गेलेला आहे व प्रत्येक देश आपापल्या खेळ्या खेळत आहे . या खेळाचे रूपांतर कधीही मोठ्या लष्करी युद्धात होऊ शकते . आज ते आर्थिक युद्धाच्या रूपाने खेळले जात आहे .

    आपण सारे जण अत्यंत शुल्लक अशा भांडणात, वादात किंवा चर्चेत पडले आहोत ,ज्याचा या सर्व जागतीक परिस्थितीशी काडीमात्र संबंध नाही . तुम्ही या विषयातील बातम्या, लेख, युट्युब वरील चर्चा जरूर ऐका व इतरानांही सावध करा .

       लक्षात ठेवा जगामध्ये ज्या ज्या देशात आज सत्ता परिवर्तन झालेले आहे, ते केवळ तीन ते चार दिवसात झालेले आहे. त्यामुळे भारत आज शांत दिसत असला तरी तो उद्या तसा राहील हे सांगता येत नाही . या सर्वाच्या मागे कोणाचे तरी मोठे षडयंत्र आहे हे लक्षात ठेवा .

प्रदीप पराडकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या