माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/09/2025 : माळशिरस तालुक्यात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये वृक्षारोपण, मिठाईवाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान, इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
सोलापूर जिल्हा काँग्रेस आय. चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवाडी निमगाव (मगराचे) या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, मिठाई, फळे इत्यादींचे वाटप करण्यात आले. गांधी चौक अकलूज येथे गिरीश शेटे यांच्यावतीने श्री गणेश उत्सव मंडळा चे कार्यस्थळी अन्नदान करण्यात आले.
निमगाव येथे निमगाव (मगराचे) ग्रामपंचायत सरपंच सुभाष रामचंद्र साठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश सचिव गिरीश प्रभाकर शेटे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर, तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब वाघमोडे पाटील, उद्योगपती दादासाहेब कोडनकर, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे गिरीश शिंदे, युवक नेते यश गिरीश शेटे, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ व नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एस टी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन यु बी सी राज्य उपाध्यक्ष राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, या मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व मुला मुलींना शालेय साहित्य, मिठाई, आणि फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मातोश्री उद्योग समूहाचे अध्यक्ष सौरभ बाळासाहेब मगर, दादासो महादेव घाडगे, लालासाहेब भगवान मगर, अथर्व दादासाहेब घाडगे, संकेत संतोष मगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवाडी निमगाव मगराचे मुख्याध्यापक प्रवीण तात्याबा शितोळे, सहाय्यक शिक्षक आदम अब्दुल मुलाणी यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या