सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्यु स्पायडर बेंगलोर येथे निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/09/2025 : शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या क्यु स्पायडर पुणे या कंपनीच्या प्लेसमेंट ड्रायव्हिंग मध्ये अंदाजे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कॉम्पुटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागामध्ये अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि.विश्वराज राजकुमार अलगुडे, चि. ज्योतिराम कुबेर भुसारे , कु. प्रणाली अजिनाथ जाधव, कु. कोमल पाटील, कु. राजेश्वरी ताटे, कु. निकिता जाधव, कु. तेजश्री भोंग, कु.जान्हवी फुले व पूनम बिटे तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातुन ज्ञानदेव देवकुळे या विद्यार्थ्यांची क्यु स्पायडर पुणे या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. पांढरे एस. डी., मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख देशपांडे जि.जि. व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

0 टिप्पण्या