⭕अमेरिकेस ठेच लागली आहे, भारतीय कधी शहाणे होतील ??
🟢 जेव्हा स्वयंपाकघर शांत झाले – अमेरिकेची खरी कहाणी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/8/2025 :
कधी विचार केला आहे का…..की एका शांत झालेल्या स्वयंपाकघराने संपूर्ण देशाचे भविष्य बदलू शकते? अमेरिकेत तसे घडले. 1970 च्या दशकात बहुतेक घरांत आई-वडील, मुले, आजी-आजोबा एकत्र राहायचे. संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलावर बसायचे. घरातली पोळी, ब्रेड, सूप, पाय (pie) फक्त पोट भरत नव्हते, तर त्यांच्यातील नातीही घट्ट करत होते. पण 1980 नंतर हळूहळू दृश्य बदलले. फास्ट-फूड, टेक_अवे, रेस्टॉरंट यांनी त्यांच्या स्वयंपाकघरावर ताबा मिळवला. आई-वडील कामात व्यस्त झाले, मुले पिझ्झा-बर्गरमध्ये रमली,
आणि आजोबांचा आवाज कमी झाला. त्याच वेळी काही तज्ज्ञांनी चेतावणी दिली होती –“जर तुमच्या घरातील जेवणाचे नियंत्रण कंपन्यांकडे गेले, आणि मुलं-वृद्धांची जबाबदारी सरकारवर टाकली, तर कुटुंबे उद्ध्वस्त होतील.” लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि खरेच तसेच झाले. 1971 मध्ये अमेरिकेत 71% कुटुंबे “पारंपरिक” होती – आई, वडील आणि मुले एकत्र. आज ती संख्या फक्त 20% आहे. उरलेले काय? – वृद्धाश्रमात गेलेले आजोबा-आजी, भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटे जगणारे तरुण, तुटलेली लग्नं, एकाकी पडलेली मुले. घटस्फोटाचे प्रमाण पहिल्या लग्नात 50%, दुसऱ्यात 67% आणि तिसऱ्यात तब्बल 74%.
अमेरिकेतील हा अपघात नाही. ही किंमत आहे – शांत झालेल्या स्वयंपाकघराची आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाची !!
कारण घरचे जेवण हे फक्त अन्न नाही.
ते ऊब आहे.
ते आईच्या हाताचा स्पर्श आहे.
ते दादांच्या गप्पा आहेत.
ते आजीच्या गोष्टी आहेत.
ते घराला “कुटुंब” बनवणारी जादू आहे. पण आज जेवण स्विगी, झोमॅटो वरून येते, आणि घर हळूहळू “गेस्टहाऊस” बनते.
*याचे दुसरे भयंकर रूप म्हणजे बिघडणारे आरोग्य !* फास्ट-फूडच्या व्यसनामुळे अमेरिकेत स्थूलता, मधुमेह, हृदयरोग एवढ्या वेगाने वाढले की आज संपूर्ण आरोग्य उद्योग “आजारी पिढ्या” वर नफा कमावतो. पण अजून आपली वेळ गेलेली नाही.
स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवे.
आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. जगातल्या अनेक संस्कृतींनी हे सिद्ध केलंय. जपानी अजूनही एकत्र स्वयंपाक करतात, जेवतात, म्हणून ते दीर्घायुषी आहेत. भूमध्य समुद्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून त्यांची नाती मजबूत आहेत. अमेरिकेची ही कहाणी आपल्याला सावध करण्यासाठी आहे!! आज भारतातही बाहेरचे खाणे, फूड-डिलिव्हरी, व्यस्त जीवन —
सगळे तसे च सुरू आहे, अमेरिकेसारखे. उद्या आपल्या घरातही स्वयंपाकघर शांत होऊ नये, म्हणून…चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा. कुटुंबाला टेबलावर आणा; कारण शयनकक्ष घर देतो, पण स्वयंपाकघर कुटुंब घडविते. आपल्या घराला कुटुंब बनवायचे आहे की, गेस्ट हाऊस हे आता आपणच ठरवा !!अनामिक
पत्रकार विकास शहा,
शिराळा (सांगली)
0 टिप्पण्या