छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिव / पाणंद रस्ते विषयक मोहीमेचे आयोजन

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत

शिव / पाणंद रस्ते विषयक मोहीमेचे आयोजन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 10/09/2025 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्र नेता नरेंद्र मोदी यांचा जन्म दिनांक 17/9/2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2/10/ 2025 या  कालावधीत शिव / पाणंद रस्ते विषयक मोहीम राबवयाची आहे. असे माळशिरस तालुक्याचे तहसिलदार सुरेश शेजूळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

त्यामध्ये पुढे सविस्तरपणे असे नमूद करण्यात आलेले आहे की, ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत जाणारा रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. रस्ता अडवले अथवा रस्ता उपलब्ध नसतो या अडचणीमुळे शेतकऱ्यांना न्यायालयात रस्त्याबाबत दाद मागावी लागते. रस्ता दावा दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल होईपर्यंत बराच कालावधी जातो. त्यामुळे रस्ता उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन रस्त्याचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याबाबत महसूल मंत्री यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न जलद गतीने निकाली काढण्यासाठी तहसीलदार स्तरावर रस्त्याच्या दाव्या बाबत महसूल रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक 12/9/2025 रोजी सकाळी 11 ते 5 या कालावधीत तहसिलदार माळशिरस यांचे कार्यालयात प्रकरणी समझोता तडजोडीने निकाली काढणे कामी या न्यायालयात दाखल रस्ता दाव्यामध्ये सुनावणी नेमण्यात आलेली आहे. यातील प्रकरणात रस्त्याच्या मागणी अनुषंगाने उभय पक्षी समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सदर प्रकरणांची यादी तहसील कार्यालय माळशिरस येथे नोटीस बोर्डावर उपलब्ध असून पक्षकारांना वैयक्तिक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरी सदर महसूल रस्ता अदालतला मोठ्या संख्येने हजर राहून प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी माळशिरस तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या