🅾️ "उडता पंजाब आणि बुडता
महाराष्ट्र"
⭕देवेंद्रजी सावध व्हा "ऊडता पंजाब तसा बुडता महाराष्ट्र" होईल.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 05/09/2025 :
एक हिंदी चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आहे त्यामध्ये आपला सीमेवरील प्रांत पंजाब यामध्ये अमली पदार्थांचा कसा व्यापार चालतो वरिष्ठ पोलीस अधिकारी व वरिष्ठ राजकारणी यांचा कसा आशीर्वाद असतो व त्यावर पोलिस अधिकारी व राजकारणी हे कसे धनाढ्य बनत चाललेत याचे चित्रण केले होते. अतिशय विदारक गंभीर आणि मनाला खिन्न करणारा हा चित्रपट होता. पाकिस्तानने पूर्ण पंजाब प्रांत हा व्यसनी करायचा अशा प्रयत्न करून आमच्यातील देशद्रोही व लोभी राजकारण्यांना व सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पंजाब प्रांताचे पूर्ण वाटोळे केलेले आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्र, पंजाब व बंगाल यामध्ये एवढे क्रांतीकारक झाले तेवढे अन्य भागात झाले नाही
⭕देशभक्त की नशाभक्त
असा हा देशभक्तीने भारावलेला पंजाब प्रांत की ज्याची फाळणीमध्ये अग्निपरीक्षा झाली होती. त्यामुळे पंजाब प्रांतामध्ये काँग्रेस पक्षाबद्दल अप्रिती व राष्ट्रवादी विचाराच्या पक्षांच्या बद्दल सहानुभूती असा विषय होता. त्यामुळे त्यावेळच्या भारतीय जनसंघाने पंजाब प्रांतामध्ये चांगलेच पाय रोवले होते. जनसंघाचे महत्त्व कमी करण्यासाठी इंदिराजींनी अकाली दलाला पुढे केली व जनसंघाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे अकाली दल व जनसंध एकत्र आले व त्यांनी काही वर्षे पंजाबमध्ये काँग्रेसला शिरकाव होऊन दिला नाही.
🟢युतीमुळे मती भ्रष्ट
त्यानंतर पुढे भाजप व अकाली दल यांच्या संयुक्त सरकार पंजाब मध्ये काही वर्षे राहिले. अकाली दलाच्या अनेक नेते व कार्यकर्ते यांनी सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा भस्मासुर पंजाब मध्ये उभा केला. त्यामुळे त्यांचा सहयोगी पक्ष भाजप हा पण बदनाम झाला व आता पंजाब मध्ये भाजप नाममात्र पण राहिला नाही.
हे असे का झाले कारण अकालीदलाच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला, अमली पदार्थांचा वापर केला. त्यामुळे अकाली दलाच्या गैर कृत्यामुळे भाजप सत्ते पासून पंजाबमध्ये लांब लांब मात्र राहिला.आज या ऊडता पंजाब बद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे *महाराष्ट्रात काय चाललंय ?*
महाराष्ट्रात 24 साली युतीला मतदारांनी भरभरून मतदान दिले व प्रचंड बहुमत मिळवून दिले. *पण भाजपवाल्यानो तुमचे सहकारी पक्ष व त्यांचे नेते हे कोणत्याही तत्त्वाशिवाय फक्त सत्तेला चिकटून राहावे म्हणून तुमच्याबरोबर आलेले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची रोज नवीन नवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. कोण डान्सबार चालवत आहे, कोण हजारो कोटी ची माया गोळा करत आहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे गणित महाराष्ट्रातील काही नेत्यांनी यशस्वीपणे बसवलेले आहे.*
🟣अकेला देवेंद्र क्या करेगा
हे वाक्य महाराष्ट्रात येथे काही फार गाजले होते. देवेंद्र भ्रष्टाचार नही करेगा हे नक्कीच आहे, पण अकेला देवेंद्र स्वच्छ राहुन चालणार नाही. त्यांचे इतर सहकारी जर भ्रष्टाचारात बुडालेले असले तर त्याचे परिणाम भारतीय जनता पक्षाला भविष्यात भोगावे लागतील."महाराष्ट्रात कोणत्या पक्षांमध्ये एक तरी आमदार दाखवा की तो दारिद्र्यरेषेच्या खाली आहे."
सर्वच आमदार हे अब्जाधीश कोट्याधीश आहेत बारा बारा तास कष्ट करुन गरीब वर्ग, मध्यमवर्ग कमाई आणि खर्च याची दोन टोके मिळवू शकत नाही. हे राजकारणी रातोरात अब्जाधीश कसे होतात ते भ्रष्टाचाराशिवाय काय ? भले त्यांनी कायद्यातील पळवाटाचा वापर करून आपले हिशोब चोख ठेवले असले तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न नेहमी पडतो हे इतके धनवान कसे झाले?
देवेंद्रजी आता सावध व्हा. महाराष्ट्राचा पंजाब होऊन देऊ नका.
त्याप्रमाणे भ्रष्टाचारी पक्षाच्या नादाला लागून पंजाब मधील भाजप नाममात्र झाला तसा महाराष्ट्रातील भाजप होईल. हे अरण्यरुदन आहे हे मला माहित आहे पण "बुडते हे जन देखवेना डोळा" असे होऊन बसले आहे. देवेंद्रजी सावध व्हा "ऊडता पंजाब तसा बुडता महाराष्ट्र" होईल.
ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी
0 टिप्पण्या