“कर्जमुक्ती व हमीभावाचा कायदा शेतकऱ्यांचा हक्कच” – विठ्ठल राजे पवार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 05/09/2025 : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार, शेतकऱ्यांची कर्जबाजारी स्थिती आणि शेतमालाला हमीभाव (MSP) या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर शेतकरी हक्क समितीच्या वतीने ओझर येथे दिनांक ३ व ४ सप्टेंबर २०२५ रोजी भगवान बोरसे यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकऱ्याचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते म्हणाले की जर सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना शेतमाल हमीभावापेक्षा कमी भाव देऊन उठत असेल तर दरवर्षी शेतकरी कर्ज मुक्तीची मागणी करतील त्याला सर्व प्रकारे राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असेल असा कडवट इशारा देत शेतकऱ्यांना त्रास देत तुम्ही बेकायदेशीर कारवाई केल्यास राज्य आणि राष्ट्राची अन्नसुरक्षा धोक्यात येईल आणि त्याला सर्व प्रकारे राज्य आणि केंद्र सरकार शासन प्रशासन जबाबदार राहील असा कठोर इशारा देत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी सर्व संघटनांच्या वतीने मुख्य घोषणा करण्यात आली की,
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती व हमीभाव (MSP) संदर्भातील मागण्या मान्य न झाल्यास दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी लाखो शेतकरी लोकनायक माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयावर “हल्लाबोल आसूड मोर्चा” काढतील, असा इशारा या मेळाव्यात देण्यात आला.
तुफान फटकेबाजी करताना विठ्ठल राजे पवार म्हणाले की यापुढे शेतकरी नाशिक जिल्हा बँकेचे किंवा सरकारचं कोणतेही देणे लागत नाही नाशिक जिल्हा बँकेने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याच्या संदर्भात बोगस कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे धाडस केल्यास संबंधितांवर देखील वैयक्तिक गुन्हे दाखल करून न्यायालयात खेचण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला आहे.सर्व शेतकरी संघटना व समविचारी पक्ष संघटनांनी २८ ऑक्टोबरच्या मुंबई मंत्रालयावरील शेतकरी हक्क आसूड मोर्चा आंदोलनात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करीत,“राज्य व केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून कर्जमुक्ती व हमीभाव कायदा करावा. अन्यथा शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी राज्य व केंद्र सरकारवर असेल असे म्हटले.
सर्व संघटनांच्या वतीने महत्त्वाच्या कायदेशीर मागण्या करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे
1️⃣ नाशिक जिल्हा बँकेतील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना यामधील ₹१७०० से कोटींहून अधिक आर्थिक गैरव्यवहाराची इओडब्लू, इडी चे माध्यमातून सखोल चौकशी ,दोषींवर EOW व ED मार्फत कठोर कारवाई करावी. त्या गैरव्यवारातील दोषी लोकप्रतिनिधी, संचालक, मंडळ , बँक कर्मचारी किंवा इतर संबंधितांवरही महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० अधिनियम ८८ अन्वये कठोर कारवाई करावी.
2️⃣ नाशिक जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाने ३७५ अनैतिक कामगार भरती व आर्थिक फसवणूक प्रकरणी, IPC अॕक्ट व महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 88 अंतर्गत गुन्हे नोंदवून कारवाई करावी.
3️⃣ बेकायदेशीर बिगरशेती कर्ज व ठेवी परताव्याचे गैरव्यवहारातील दोषी तत्कालीन संचालक मंडळ बँकेचे अधिकारी यांचे मालमत्ता व सदर बाबत, ED मार्फत चौकशी व दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
4️⃣ राज्यातील सर्व गरजवंत पीछडावर्ग शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावाचा गॅरंटी बेस रेट कायदा
सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज तातडीने माफ करावे.
सर्व शेती उत्पादनांना बेसरेट/हमीभाव देणारा कायदा केंद्र व राज्य सरकारने करावा.
5️⃣ शेतकरी आत्महत्या – सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
नाशिक बँक, महसूल व सहकार विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर चुकीच्या सक्तीच्या वसुलीमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्यांबाबत सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
ठराव (४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या समारोप सभेत पारित):
राज्य व केंद्र सरकारने तात्काळ संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी.
शेतमालाला गॅरंटी एमएसपी बेसरेट देण्यासाठी कायदा करावा.
कृषी किंमत न्यायाधिकरण स्थापन करावे.
शेतकऱ्यांच्या वादासाठी स्वतंत्र कृषी न्यायालये स्थापन करावीत.
ऊस उत्पादक शेतकरी महामंडळ, दूध उत्पादक शेतकरी महामंडळ, व शेतमजूर कष्टकरी कामगार विकास महामंडळ तातडीने स्थापन करावे.
नाशिक जिल्हा बँकेने चुकीच्या पद्धतीने कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर केलेल्या नोंदी पूर्ववत कराव्यात. बँक वसुलीतील पठाणी कारवाई तात्काळ थांबवावी.
यावेळी मेळाव्यात उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक भगवान बोरसे, कैलास बोराडे, अॅड. दिलीप पाटील, व प्रमुख वक्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, इंजि. सतीश देशमुख, अॅड. श्रीकांत पाटील, धनंजय काकडे देशमुख (अमरावती), सुधाकर मोगल, अनिता कोल्हे (महिला आघाडी), शिवराम पाटील (जळगाव), डॉ. शाम अष्टेकर, डॉ. प्रवीण कुमार राऊत अमरावती, श्रीकांत तराळ (वरिष्ठ पत्रकार), मोतीराम त्र्यंबक पाटील (वरिष्ठ शेतकरी नेते), तसेच शेतकरी, कामगार, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या