💢 नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या जीवनात होत आहेत अमुलाग्र बदल.
🟠 सौ .वैष्णवीदेवी व अर्जुनसिंह मोहिते - पाटील या उभयतांच्या प्रयत्नांना यश :
खासदार धैर्यशिल मोहिते - पाटील यांचे प्रतिपादन
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 06/09/2025 :
शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्याकडे माळशिरस तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना आज दि.6 सप्टेंबर 2025 रोजी शंकरनगर- अकलूज येथे प्रातिनिधिक स्वरूपात गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगीअकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते - पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते - पाटील , शिवरत्न वेल्फेअर ट्रस्टच्या उपाध्यक्ष सौ .वैष्णवीदेवी मोहिते - पाटील , तालुका सुविधा अधिकारी सौ.मनीषा पवार व गावपातळीवर कामगारांना नोंदणी करण्यासाठी सहकार्य करणारे सेवाभावी युवक ,कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
संघटित व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनातर्फे विविध योजनांचा लाभ दिला जातो याचा प्रसार सर्वप्रथम आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात केला आहे. त्याची अंमलबजावणी सर्वप्रथम माळशिरस तालुक्यात झाली. त्यानुसार माळशिरस पंचायत समितीमध्येनोंदणी कक्ष सुरू करण्यात आला . त्यामध्ये तालुक्यातील ३ हजार ८oo बांधकाम कामगारांची नोंद झाली .त्यासाठी सौ.वैष्णवीदेवी व अर्जुनसिंह मोहिते -पाटील यांनी मोठा पाठपुरावा केल्याचे खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांनी सांगितले .अशा कामगारांना आतापर्यंत अनेक लाभ व सुविधा पुरवण्यात आल्या . कोरोना काळात या कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी शासनाकडून पाच हजार रुपयांचे अनुदान या कामगारांना मिळवून दिले होते. तालुक्यातील ज्या नोंदणीकृत कामगारांनी गृह उपयोगी वस्तू संच मागणीचे प्रस्ताव दिले होते त्यांना आज (शनिवार ) पासून या वस्तू संचाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आणखी ज्यांना असे संच हवे आहेत त्यांनी आपले प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे आवाहन देखील सौ . वैष्णवीदेवी व अर्जुनसिंह मोहिते पाटील या उभयतांनी केले आहे .
0 टिप्पण्या