🟨 मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/09/2025 :
"व्यसनाधिनता" ही कौटुंबिक समस्या न राहता आता ती सामाजिक झाली आहे. पूर्वी लोक गुपचूप व्यसने करत. कोणाला अगदी घरातील मोठ्यांना, महिला, मुले यांना समजणार नाही याची काळजी घ्यायचे.
आता चित्र बदलले आहे. अंमली पदार्थांची विक्री, सहज होणारी उपलब्धता यामुळे अनेकजण व्यसनात अडकलेले दिसतात. मुली किंवा महिला पण यामध्ये मागे नाहीत.
अमलीपदार्थांचे इतके प्रकार आहेत की त्यातले अनेकांची नावे पण सर्वसामान्यांना माहित नाहीत.
यातून तरुण पिढी पोखरली जाते. आपला पैसा तर जातोच पण आरोग्याचे पण नुकसान होते. मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य बिकट घडते. नशा करून सार्वजनिक ठिकाणी वावरणे, गाड्या चालवणे यामुळे इतरांची सुरक्षितता धोक्यात येते.
आजचा संकल्प
सर्व दृष्टीने विचार केला तर तरुण असो वा वयस्कर अंमली पदार्थांचे सेवन हे स्वतःच्या व सर्वांच्याच दृष्टीने अयोग्य आहे हे लक्षात ठेवू व जे कोणी करत असतील त्यांना पण परावृत्त करू.
सौ. स्नेहलता स. जगताप
####################

0 टिप्पण्या