⭕जातिव्यवस्था ही नैसर्गिक नाही, ती अनुकरणाची देणगी आहे. 🅾️ माणसाची एक प्रवृत्ती आहे — श्रेष्ठ वाटणाऱ्याचं अनुकरण करायचं.


⭕जातिव्यवस्था ही नैसर्गिक नाही, ती अनुकरणाची देणगी आहे.

🅾️ माणसाची एक प्रवृत्ती आहे — श्रेष्ठ वाटणाऱ्याचं अनुकरण करायचं. 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 05/09/2025 :

 समाजशास्त्रज्ञ गॅब्रिएल टार्ड म्हणतो

1️⃣ अनुकरण नेहमी वरून खाली होतं.

2️⃣ जवळचं जास्त अनुकरण होतं.

3️⃣ जितकं अंतर वाढतं, तितकं अनुकरण कमी होतं.

हिंदू समाजात हे अगदी खरं ठरलं. ब्राह्मणांना इतकं उंच स्थान, प्रतिष्ठा आणि "अर्धदेव" मान दिला गेला की बाकी समाजाने त्यांचं जीवनपद्धतीचं अनुकरण केलं.

ब्राह्मणांनी आपलं जीवन बंदिस्त, स्वतंत्र आणि वेगळं ठेवलं… तर इतर समाजगटांनीही तसंच करण्यास सुरुवात केली. यातूनच जन्माला आली जातिव्यवस्था

डॉ. आंबेडकर सांगतात :

"अनुकरण सोपं आहे, पण नवनिर्मिती कठीण आहे.

म्हणूनच जाती निर्माण झाल्या, टिकल्या आणि आजही समाजाला जखडून ठेवतात. जात ही दैवी व्यवस्था नाही — ती फक्त अंधानुकरणाची देणगी आहे.

मित्रांनो, आपण अनुकरण नव्हे तर नवीन विचार स्वीकारला तरच खरी समानता आणि प्रगती शक्य आहे.

जात एकवचनी नसते… जाती बहुवचनी असतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की,

ब्राह्मणांनी जे नियम, रूढी व प्रथा (सती, विधवापण, बालविवाह) सुरू केल्या, त्यांचे इतर जातींनी अनुकरण केले पण हे अनुकरण अपूर्ण व विकृत होत गेले. काहींनी मुलींचा लवकर विवाह केला, काहींनी विधवेला आयुष्यभर अडकवून ठेवलं, तर काहींनी फक्त श्रद्धा व अंधानुकरण स्वीकारलं. अशा रीतीने उच्च जातींचं केलेलं अनुकरण म्हणजेच खालच्या जातींना कैद करणारी भिंत ठरली.

बाबासाहेब ठाम सांगतात की

जात ही एकटी अस्तित्वात येऊ शकत नाही.

"जात" हा शब्दच चुकीचा आहे, कारण जाती नेहमी दुसऱ्या जातीच्या तुलनेतच जगतात

एक जात दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही, जशी सावली प्रकाशाशिवाय नसते.

म्हणूनच जातव्यवस्था ही निसर्गाची नाही, ती मानवनिर्मित कैद आहे. मनुष्य स्वतःला स्वतःच्याच हाताने या कैदेत बंद करून घेतो.

चला, या कैदी भिंती मोडूया. जात नव्हे तर माणूस हाच धर्म मानूया.

72190 17700

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या