🅾️ विज्ञानाने तुम्हाला सुरक्षित कसं जगायचं हे शिकवलं आणि शिकवत आहे...

 🅾️ विज्ञानाने तुम्हाला सुरक्षित कसं जगायचं हे शिकवलं आणि शिकवत आहे...   

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 07/09/2025 : विज्ञानाने तुम्हाला सुरक्षित कसं जगायचं हे शिकवलं आणि शिकवत आहे...   तरी देखील आम्ही त्या आकाशातल्या भ्रामक अशा आमच्याच डोक्याने निर्माण केलेल्या "अज्ञात शक्तीला" भजायचं काही सोडून देत नाही.

सकाळी उठल्यानंतर घड्याळ बघतो जे 'प्रिन्सिपल ऑफ ऑसिलेशन' या विज्ञानाच्या नियमाने बनवलेलं आहे. ते आम्हाला माहितीच नसतं आणि आम्ही हात जोडतो भलतीकडेच.

उठल्यावर आम्ही हातात टूथपेस्ट घेतो आणि दात घासतो आणि हे विसरतो की त्यामध्ये विज्ञान आहे. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड, ऍब्रेसिव्ह, फ्लेवरिंग, ग्लिसरॉल आणि डिटर्जंट संयुगे असतात. स्टॅनस फ्लोराइड पोकळी आणि हिरड्यांना आलेली सूज निर्माण करणारे बॅक्टेरिया देखील मारतात.

जेव्हा तोंड धुतो तेव्हा ते तीर्थ नसतं तर त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन गोष्टी असतात. ज्या आयुष्यभर माणसाला जिवंत ठेवण्यास मदत करत असतात.

आंघोळ करताना साबण हातात घेतो तो साबण हे फॅटी ऍसिडचे मीठ आहे (कधीकधी इतर कार्बोक्झिलिक ऍसिडस्) साफसफाई आणि स्नेहन करतात. म्हणजे दिवसभर स्वच्छ राहण्यासाठी भस्म वापरून उपयोगाचं नसतं, एवढे तरी कळायला हवं?

नाश्ता आणि जेवण करण्यासाठी थोडक्यात पोट भरण्यासाठी आम्ही यज्ञ पेटवत नाही आणि त्याचा धूर वापरत नाही. तर विज्ञानानं दिलेला गॅस सिलेंडर वापरतो. गॅस सिलेंडरमध्ये एलपीजी म्हणजेच लिक्विड पेट्रोलियम गॅस असतो. एलपीजी कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूपासून काढले जाते. हे तीन किंवा चार कार्बन अणूंसह हायड्रोकार्बन्सचे बनलेले आहे. अशा प्रकारे, एलपीजीचे सामान्य घटक आहेत- प्रोपेन आणि ब्युटेन.

मग चढवतो आपण कपडे. आणि हे कपडे कुणी देवाने आपल्या संरक्षणासाठी पाठवून दिलेले नाहीत. या कापडामध्ये विज्ञान असतं आणि हे विज्ञान आपल्याला ऊब देतात.. थंडीपासून संरक्षण करतात. असं हे कापड प्राणी (लोकर, रेशीम), वनस्पती (कापूस, फ्लेक्स, जूट, बांबू), खनिज (एस्बेस्टोस, ग्लास फायबर) आणि सिंथेटिक (नायलॉन, पॉलिस्टर, ॲक्रेलिक, रेयान) यातून तयार होतं.

कुठलातरी मंत्र म्हणून तुम्ही फ्रेश होत नाही. तर तुम्ही चहा घेता. चहाचे विज्ञान सांगतं की चहामध्ये असलेले वास आणि चव व सुगंध देणारे, पॉलिफेनॉल, कॅफीन, फ्लॅव्हॅनॉल आणि टॅनिन आणि एक्साईट करून सोडणारे एल थिएनिन असते. विज्ञान आहे हे, मंत्र विद्या नाही.

कुठलीतरी सुपर नॅचरल पावर तुम्हाला दिवसभर इकडे तिकडे फिरवत नाही तर विज्ञानाने दिलेलं पेट्रोल तुम्हाला दिवसभर कामावर पोचवत किंवा काम करायला लावत. पेट्रोलमध्ये नैसर्गिक वायू आणि बिटुमेन असतं. हायड्रोकार्बन आहे ते

सारं काही विज्ञान असताना आम्ही मात्र कुठेतरी आकाशातल्या नाहीतर कुठल्यातरी भिंतीमध्ये जे नाही त्याला बघत बसतो. भजत बसतो  आणि मंत्र पुटपुटतो. विज्ञानामुळे सगळं चाललंय हा आमच्या गावीही नसतं.

असा कृतघ्नपणा करतो कारण बुद्धी भ्रष्ट झाली की सुचणार काय? आणि बुद्धी भ्रष्ट करतात, देव, सुपरनॅचरल पाॅवर, धर्म, अतिंद्रिय शक्ती, अध्यात्म, वगैरे अवैज्ञानिक गोष्टी.

सुचणार कसं मग विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन?

72190 17700

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या