सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/09/2025 : शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व विभागांमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती प्रा. पांढरे एस. डी. यांनी दिली.
या प्रसंगी प्रा. पांढरे एस. डी. यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विभागामध्ये विविध टेक्निकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सुमारे 900 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहीले.

0 टिप्पण्या