माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्षपदी गिरीश शेटे यांची निवड

 

माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्षपदी गिरीश शेटे यांची  निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे,  

मुंबई दिनांक 28/09/2025 :

अकलूज येथील गिरीश प्रभाकर शेटे यांची काँग्रेस पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड  आली आहे.

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात निवड समिती समोर ब्लॉक अध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या निवड समितीने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील माळशिरस ब्लॉकच्या ब्लॉक अध्यक्षपदी गिरीश शेटे यांची निवड केली.

"तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून लवकरच माळशिरस तालुक्याची कार्यकारणी निश्चित केली जाईल. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक लावण्यात येईल. बैठकीमध्ये इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या इच्छा जाणून घेऊन विचार विनिमय करून पक्ष वाढी साठी केलेले योगदान लक्षात घेऊन पदाधिकारी निवडण्यात येतील असे याप्रसंगी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी "अकलूज वैभव"ने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी काँग्रेस पक्षाचे नूतन तालुका अध्यक्ष गिरीश शेटे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या