🟩 तृतीयपंथींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार -तहसिलदार सचिन लंगुटे 🟦 तृतीयपंथी यांची बैठक संपन्न

🟩 तृतीयपंथींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार

      -तहसिलदार सचिन लंगुटे

🟦 तृतीयपंथी यांची बैठक संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

पंढरपूर (दि.17) - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस  ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये "सेवा पंधरवाडा"  साजर करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये "तृतीयपंथी" यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील तृतीयपंथी यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत  असे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि.17 सप्टेंबर  ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.2 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजर करण्यात येत आहे. याबाबत शासनाने आदेश पारित केलेला आहे. या कालावधीमध्ये तृतीयपंथी यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत नमुद केलेले आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तृतीयपंथी यांना जातीचे दाखले, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखले, शिधापत्रिका, संजय गांधी योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, मतदान कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देण्याबाबत तृतीयपंथी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस तृतीयपंथी यांचे गुरूवर्य परसू हणमंत पवार, सिमा माने, वैशाली शिरसट व इतर बहुसंखेने उपस्थित होते.

        या बैठकीमध्ये तहसिलदार सचिन लंगुटे, निवासी नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या