🛑 रत्नत्रय ग्रामीण भागात शहरासारखे शिक्षण उपलब्ध करून देणे ही गौरवाची बाब - सौ.सुषमा महामुनी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/09/2025 :
"मी शाळेत असताना मांडवे येथून शिकायला नातेपुते येथे जात होते आणि आता माझा मुलगा माळशिरस वरून "रत्नत्रय" मध्ये शाळेला येतो कारण या ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता चांगली आहे." असे विचार माळशिरस तालुका गटशिक्षणाधिकारी सौ सुषमा महामुनी यांनी मांडवे येथे व्यक्त केले. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीच्या 17 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी होते.
पुढे बोलताना सौ महामुनी म्हणाल्या की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरासारखे शिक्षण ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देणे ही गौरवाची बाब आहे. येथील शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. संस्थेचे सचिव प्रमोद दोशी यांनी सांगितले की, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या हेतूने ही संस्था सुरू करण्यात आली. आज या संस्थेत 86 च्या वर विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांचा खर्च संस्था करते. ज्ञानदान हे पवित्र दान आहे हे ओळखून आमच्या कुटुंबीयांनी ही संस्था सुरू केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की शाळेचा वर्धापन दिन म्हणजे एक एक वर्षांनी आपण संस्थेची प्रगती करत असतो. लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य रत्नत्रय शिक्षण संस्था करत आहे. स्वच्छ शाळा व सुंदर शाळा हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात आमच्या शाळेने राबवला होता. आपल्या शाळेचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पहिला असला पाहिजे त्यासाठी आमच्या प्रशालेचे सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक विरकुमार दोशी, संस्थेचे संचालक रामदास कर्णे, वैभव शहा, बबन गोफणे, सुरेश धाईंजे, वसंत ढगे, ज्ञानेश राऊत, विनय दोभाडा, रामभाऊ गोफणे, विशाल गांधी, अमित गांधी, रोनक चंकेश्वरा, निश्चल होरा, तसेच दहिगाव नातेपुते माळशिरस मांडवे सर्व शाखेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गळवे यांनी केले तर आभार संस्थेचे मार्गदर्शक विरकुमार दोशी यांनी मानले.

0 टिप्पण्या