🛑 "महर्षि संकुल" च्या वतीने पालक मेळावा व व्याख्यानाचे आयोजन 🔵 "मुलांच्या भविष्यासाठी चांगले वातावरण निर्माण करणे पालकांची जबाबदारी"--इंद्रजीत देशमुख


🛑 "महर्षि संकुल" च्या वतीने पालक मेळावा व व्याख्यानाचे आयोजन

 🔵 "मुलांच्या भविष्यासाठी चांगले वातावरण निर्माण करणे पालकांची जबाबदारी"--इंद्रजीत देशमुख 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 22/8/2025 : बाप हाच मुलाचा पहिला गुरु असतो.तर आईचा स्पर्श जगातील सर्वात ताकदवान चार्जर आहे. पालकांनी आपल्या मुलांना भविष्यात जगण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.समाजात जगताना शब्दांचा वापर हा आपले संस्कार दर्शवितो.त्यामुळे ज्या व्यक्ती, कुटुंब आणि समाजातील जिवन मुल्य ऊच्चप्रतीची तेवढा तो व्यक्ती, कुटुंब आणि समाज सुखी असल्याचे कोल्हापुर चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी सांगितले.

शंकरनगर येथील महर्षि संकुलातील,महर्षि प्रशाला,लक्ष्मीबाई कन्या प्रशाला व प्राथमिक विभाग यांचे वतीने  इंद्रजित देशमुख यांच्या "डिजीटल युगात मुलांचे संगोपन" या विषयावर व्याख्यान व पालक मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील, महर्षि प्रशालेचे सभापती ॲड. नितीनराव खराडे पाटील, ज्ञानाई गुरुकुलचे ह.भ.प.सुरेश सुळ महाराज,अनिल जाधव, मुख्याध्यापक संजय गळीतकर, शिवाजी पारसे,सौ. अनिता पवार यांचेसह स्थानिक प्रशाला समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या,  डिजीटल युगात मुलांची मानसिक प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे.मुलांचे फक्त गुण वाढविणे हाच उद्देश न ठेवता मुले आयुष्यभर सुखी राहण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.मुलांचा मानसिक, शारीरीक आणि भानवनिक समतोल जोपासने गरजेचे आहे.त्याचप्रमाणे मुलांचे लाड न करता त्यांना निर्णयक्षम बनवा असे अवाहनही त्यांनी पालकांना यावेळी केले.

       मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रस्ताविकात म्हटले, मुलांच्या सर्वगुण संपन्नतेसाठी  शाळा ,समाज आणि पालकांचा समन्वय चांगला असायला हवा.मुलांची पहिली शाळा हे घर असते तर पहिला गुरु पालक असतो.मुलांकडे मार्कांचा अट्टाहास न करता त्यांना आवडीचे शिक्षण द्यावे. सूत्रसंचालन सौ. नाझिया मुल्ला, ईलाई बागवान यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या