"बालविवाह थांबवण्यासाठी सर्व यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा"- विकास दिंडोरे


"बालविवाह थांबवण्यासाठी सर्व यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा"- विकास दिंडोरे 

वृत्त एकसत्ता न्यूज

माळशिरस प्रतिनिधी दिनांक 20/8/2025 : आपल्या तालुक्यातील बालविवाह थांबवायचा असेल तर संबंधित सर्व यंत्रणांचा सक्रिय सहभाग हा आवश्यक आहे त्याचबरोबर सामाजिक स्तरावर ही तितकेच प्रबोधन गरजेचे आहे असे मत माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे यांनी व्यक्त केले. 

जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस पंचायत समिती येथे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 व बाल न्याय (काळजी व संरक्षण अधिनियम) 2015 या  कायद्याची माहिती देण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी ते बोलत होते.  हे शिबिर  माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, अंगणवाडी  सेविका, पोलीस पाटील या सर्वांसाठी होते या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी आसमा अत्तार बालकल्याण समिती सदस्य एडवोकेट सुवर्णा कोकरे,  पंचायत विस्तार अधिकारी मच्छिंद्र जाधव व आत्माराम कोळी  संरक्षण अधिकारी पी एस वावरे माळशिरस जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड जिल्हा चाइल्ड लाइन 1098 चे समन्वयक आनंद ढेपे व एस बी सी तीन युनिसेफ चे समन्वयक सिद्धाराम गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर प्रशिक्षण शिबिरात सुवर्णा कोकरे तसेच पी एस वावरे व सिद्धाराम गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सारिका हुकेरी, पल्लवी वटाणे यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या