🟡 सकल मराठा समाज, माळशिरस तालुक्याच्या वतीने प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांचा सत्कार

🟡 सकल मराठा समाज, माळशिरस तालुक्याच्या वतीने प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांचा सत्कार

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 23/8/2025 : प्रा. डॉ. मीनाक्षी अमोल जगदाळे यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयात   पीएचडी पदवी संपादन करून आपल्या ज्ञानाचा शिखर गाठला आहे. त्यांची ही १२ वी पदवी आहे.त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सकल मराठा समाज, माळशिरस तालुक्याच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना शाल, श्रीफळ, फेटा देऊन गौरविण्यात आले. आपल्या अभ्यासातून व चिकाटीमुळे मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे मराठा समाजासह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. मिनाक्षी जगदाळे यांनी आपल्या यशामध्ये मार्गदर्शक, कुटुंबिय व समाजाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीमुळे मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या