🛑 स्व. पांडुरंग रामजी पाटील पूल नुतनीकरण
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 3/8/2025 :
वडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व.पांडुरंग रामजी पाटील पूल नुतनीकरण करण्यात आला आहे.यासाठी दोन वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष स्वर्गीय पांडुरंग रामजी पाटील सोशियल फाउंडेशन च्या वतीने रणजितसिंह पाटील यांनी खासदार धैर्यशिल माने दादा यांना नूतनीकरणाबद्दल पाठपुरावा केला व विनंती केली त्यानुसार त्यांनी तातडीने जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन बजेटमध्ये हे पुल समाविष्ट करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार त्यांनी विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र सुवर्ण नगरोस्थान अभियान जिल्हास्तर अंतर्गत खर्च ( २ कोटी ५० लाख ) नूतनीकरण केले.
नागोबावाडी ते वडगाव यांना जोडणारा हा पुल १९६०मध्ये नगराध्यक्ष पदाच्या कार्यकर्दीत स्व. पांडुरंग रामजी पाटील पूल बांधण्यात आला होता. त्यावेळेस शरद गो. पवार (राज्य ग्रहमंत्री महाराष्ट्र) यांच्या शुभहस्ते व आमदार नामदेवराव हटकर यांच्या अध्यक्षतेखाली त्याची नामकरण २२ एप्रिल १९७२ ला करण्यात आले होते. त्यानंतर सलग ६५वर्षे या परिसरातील नागरिकांची वाहतूक या पुलावरून चालू होती सध्या पूलाची उंची व रुंदी वाढवून नूतनीकरण करण्यात आले आहे.
स्व.पांडुरंग रामजी पाटील यांची दैदिप्यमान कारकीर्द.•
सर्वसामान्य शेतकरी कुंटुबातील पांडुरंग रामजी पाटील उर्फ आण्णा यांनी स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात प्रवेश केला. त्यांना समाजसेवेची पहिल्या पासून आवड होती. त्यानंतर ते नगराध्यक्ष झाले. आपल्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी लोकांची मने जिंकली.समाजसेवा करत असताना त्यांनी वडगाव नगरपालिकेची निवडणूक लढवली व पहिल्याच प्रयत्नात ते जिंकुन आले.त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी यश मिळवले.वडगाव नगरपालिकेचे ते नगरसेवक म्हणून (सन१९५० ते १९९६) सलग ४६ वर्ष नगरसेवक होते.महाराष्ट्रात हा विक्रम आहे.त्यांनी स्वत: शिक्षणाचा गंध नसताना वडगावच्या नगराध्यक्ष पदी विराजमान होण्याचा विक्रम केला. हे त्यानी केलेल्या मुत्सद्दी राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रचंड संघटना कौशल्य त्याना लाभले होते.सामाजिक कार्य, समाजकारण यामुळे जनमानसात त्यांच्या बद्दल एक आदरयुक्त भिती असायची.१९५९ मध्ये आपल्या मितभाषी व लाघवी स्वभावामुळे तत्कालीन नगरसेवकांनी त्यांची सर्वानुमते नगराध्यक्ष म्हणुन निवड केली.वडगावचे त्यांनी साडे तीन वर्ष नगराध्यक्ष पद भूषविले आहे. सन (१७-१-१९५९ ते १२-७-१९६२) तर उपनगराध्यक्ष, म्हणून त्यांनी साडे ९ वर्ष पदभार सांभाळला.सन (२४-११-१९५४ ते ११-२-१९५६ ), (२-७-१९६७ ते १६-१२-१९७४), (७-१-१९८१ ते ५-२-१९८२) पर्यंत.
त्याचबरोबर वडगाव बाजार समितीचे ते दहा वर्षे संचालक होते.स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने साहेब व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते माने साहेबांना नेहमी वडगाव मध्ये त्यांनी सहकार्य केले. अजातशत्रू व्यक्तिमत्वामुळे गोरगरिबांची समाजसेवा करत असताना त्यांनी सहकार क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवला. वडगाव अर्बन बँकेचे कित्येक वर्षे संचालक होते. त्याचबरोबर शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संस्थेचे माजी सदस्य म्हणुन त्यांनी काम करत असताना वडगाव मध्ये शैक्षणिक भरपूर कार्य केले आहे.आण्णानां शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था होती.त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकर्दीत राज्यस्तरीय जनावरांचे प्रदर्शन झाले त्यावेळी ते प्रदर्शन प्रचंड लोकप्रिय झाले होते.जनतेची प्रदिर्घ समाजसेवा करणारे व्यक्ति म्हणुन आजही वडगाव मधील लोक त्यांची आठवण काढतात.
वडगावचे रोप्यमहोत्सवी नगराध्यक्ष कै विजयसिंह यादव यांना प्रथम नगराध्यक्ष करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पेठवडगांव मधील वडगांव ते नागोबावाडी,अंबप फाटा,एन एच ४ हायवे,ला जोडणारा तसेच आता पुलाची उंची वाढवून नवीन पुल उभारणी करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले केले आहेत.
आज आण्णांचे कार्य त्यांचे नातु काॅन्ग्रेसचे जिल्हा वक्ता अध्यक्ष रणजितसिंह पाटील चालवत आहे.
1 टिप्पण्या
सुंदर लेख
उत्तर द्याहटवा