✳️ मनाची शुद्धता

✳️ मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 31/8/2025 :

सध्या पार्टी देणे किंवा पार्टीला जाणे हा नियमित प्रकार घडत आहे. अगदी किरकोळ गोष्ट असली तरी पार्टी. चहा-बिस्कीट पासून ओल्या पार्टी पर्यंत त्या चालतात.

पूर्वी घरी काही पदार्थ किंवा जेवणावळी करून हा आनंद व्यक्त केला जायचा. त्यामध्ये घरातील सर्व आनंदाने सहभागी व्हायचे. तो एक प्रकारचा सोहळा असायचा.

आता आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत? बाहेरचे खाद्य आरोग्याच्या दृष्टीने कसे असते ते वेगळे सांगायला नको. पश्चिमत्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपण भरकटतो आहोत का? आरोग्याशी खेळतोय का?

आजचा संकल्प

स्वातंत्र्य आहे, पैसा आहे म्हणून निर्णय घेताना बेफिकीर न राहता, आरोग्याचा विचार करू. घरात बनलेल्या अन्नाला पर्याय नाही हे पुढील पिढीवर संस्कार करू व सर्वांचेच आरोग्य जपू._

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या