🟪 मेलेल्या हिप्पोचं फुगलेलं पोट, ✳️ अमेरिकन अर्थव्यवस्थेचं क्रूर सत्य

 संपादकीय पान.........✍️



🟪 मेलेल्या हिप्पोचं फुगलेलं पोट,

✳️ अमेरिकन अर्थव्यवस्थेचं क्रूर सत्य

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 3/8/2025 : दुरून पाहिल्यानंतर, मेलेला हिप्पो पाण्यात तरंगताना आपणाला दिसतो. मेल्यानंतर आकारापेक्षा फार मोठा दिसतो, जाडसर वाटतो, सर्वाना वाटत किती मोठा हिप्पो आहे. पण, तो मृत आहे हे, कुणाच्याही लक्षात येत नाही. अशीच गत देखील अमेरिकेची झाली आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 नंतरचा जगातला सुपरपॉवर अमेरिका. डॉलरचे साम्राज्य, वॉल स्ट्रीटचा दबदबा, जगभरातले ट्रेडवर वर्चस्व आणि अमेरिकन फेडरल बँकेचे व्याजदर हे जगाच्या अर्थव्यवस्थेचं देवाचं ब्रह्मवाक्य समजलं जायचं. पण आज 2025 ला उभं राहून पाहिलं तर अमेरिका ही केवळ एक फुगलेल प्रेतं आहे वाटते, जी अजून फुटलेली नाही इतकंच फरक आहे.

खरोखर अमेरिका बलाढ्य आर्थिक शक्ती आहे.? तर आपण बघूया अमेरिकेची अर्थव्यवस्था व त्यांच्या अवास्तव फुगवटा.

 🅾️ अमेरिकेचा GDP एक आभासी बुडबुडा जो कधीही संपू शकतो : जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असण्याचा जो गर्व अमेरिकेला आहे. त्यामागे आजही GDP च्या आकड्यांमधलं मोठेपण आहे. सुमारे 28 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपासचं अमेरिकेचं GDP आजही जगात सर्वात मोठं आहे. पण हे आकड्यांमागचं खरं वास्तव वेगळं आहे.

अमेरिकेचा GDP जगात सर्वाधिक आहे, पण हा GDP उत्पादनात नाहीतर कर्ज, स्टॉक मार्केट, डिजिटल सेवा आणि फेडरल प्रिंटिंग प्रेसवर आधारित आहे. सर्व्हिस सेक्टर 80% पेक्षा जास्त म्हणजे गुड्स उत्पादनाचा आधारच नाही. अतिरिक्त पैसे छापून मार्केटला पिढ्यानपिढ्या उत्तेजन देणं म्हणजे अर्थव्यवस्थेचं कृत्रिम पोषण करणे होय. अर्थात हिप्पो मृत आहे, पण त्याचं पोट अजून फुगलेलं आहे.

❇️⭕ अमेरिकेचा फिस्कल डेफिसिट हा, आमदनी अट्ठनी खर्चा रुपया

2024 - 25 साली अमेरिकेचं फिस्कल डेफिसिट $1.9 ट्रिलियनवर पोहोचलं आहे म्हणजे अमेरिका आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत प्रचंड खर्च करत आहे. दिवसेंदिवस अधिक पैसे छापा अधिक खर्चा करा हेच अमेरिकन धोरणं आहे. 2025 मध्येही अमेरिका दर सेकंदाला सुमारे $40,000 कर्जात अडकत आहे.

🛑 कर्जाचा डोंगर घेऊन व्हेंटिलेटरवर अमेरिकन अर्थव्यवस्था.

अमेरिकेचं एकूण राष्ट्रीय कर्ज $34 ट्रिलियनच्या पुढे गेलं आहे. आणि उतपादन $28 ट्रीलियन उतपन्न पेक्षा कर्ज जास्त. प्रत्येक अमेरिकन नागरिकावर दरडोई कर्ज $1 लाखाच्या वर गेलं आहे. हे कर्ज सरकार, बँका, कंपन्या आणि सामान्य लोक यांच्या श्वासोच्छ्वासात भरलं गेलं आहे. व्याज फेडण्यासाठी दरवर्षी $1 ट्रिलियनहून अधिक रक्कम खर्च होते. म्हणजे कर्जाचं व्याज फेडताना नवीन कर्ज घ्यावं लागतं.

⚫ अमेरिकेत महागाईचा आंगडोंब उसळला आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवून महागाई थोपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे कर्जबाजारी वर्गाचे कंबरडे मोडलं आहे. मार्च 2025 पर्यंत CPI महागाई दर 3.5% च्या आसपास असून, घरभाड्यांपासून अन्नधान्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचे दर गगनाला भिडले आहेत. घर खरेदी करणं, शिक्षण घेणं, हेल्थकेअर सर्व गोष्टी अमेरिकेत फक्त श्रीमंत लोकांसाठी उरल्या आहेत.

🔲 अमेरिकेन डॉलर व्हेंटिलेटरवर :

एकेकाळी जागतिक व्यापारात 85% व्यवहार डॉलरमध्ये होत होते, ते आता 60% च्या खाली आले आहेत. BRICS देशांनी डॉलरला पर्याय उभा केला आहे, आणि RMB, INR, Gold-backed युआन यांचा वापर वाढत आहे. Petro - Dollar युगही संपत आलंय सौदी अरब आणि चीन, रशिया यांनी आता डॉलरला बायपास करून व्यवहार सुरू केले आहेत, यात भारत सुद्धा मागे नाही.

🕛 क्रेडिट कार्ड, स्टुडंट लोन आणि मोरगेज अमेरिकन नागरिकांचं आत्महत्येचं वित्तीय नेटवर्क :

अमेरिकन क्रेडिट कार्ड धारक कर्ज: $1.3 ट्रिलियन, स्टुडंट लोन कर्ज: $1.7 ट्रिलियन, मोरगेज कर्ज: $12 ट्रिलियन या कर्जाच्या पाशात सामान्य अमेरिकन नागरिक अडकलेला आहे. दर महिना किमान ५% अमेरिकन लोक डिफॉल्टर होत आहेत म्हणजे EMI न भरू शकणारे. घर विकून घरभाड्याच्या खोल्यांत जाणारी मिडल क्लासची लाट सुरू झाली आहे.

सरते शेवटी हेच म्हणावं वाटतंय. Superpower असलेली अमेरिका आता सॉफ्टपॉवर आणि हायपरप्रिंटिंग पॉवरवर अवलंबून आहे. फेडरल बँक नवीन डॉलर छापते आणि देश चालवते. पण ही मुद्रास्फीतीचे डोस आता दुष्परिणाम देत आहेत.

थोडक्यात सांगायच झाल्यास अमेरकीन अर्थव्यवस्था म्हणजे फुगवलेली जीडीपी, बेफाम छपाई, अनियंत्रित कर्ज, व्याज फेडण्यासाठी नवीन कर्ज, डॉलरची आंतरराष्ट्रीय पत डळमळीत आणि सामान्य नागरिक दैनंदिन जीवनात भरडतो आहे.

स्वतःच्या अर्थव्यवस्थेला व्हेंटिलेटरवर टाकलेला अमेरिका भारताला कोणत्या तोंडाने डेड इकॉनॉमि म्हणतोय? स्वतःच्या इकॉनमी वाचवण्यासाठी इतर देशांना टॅरिफ कमी करा म्हणून विनवण्या करतोय.

⤵️93 26 36 53 96 

                   संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या