बाळासाहेब आप्पासो. मगर यांची सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 09/07/2025 :
बाळासो आप्पासो मगर (निमगाव मगराचे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांची शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ चे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सदर पदासाठी साठी नेते मगर यांच्या नावाची शिफारस केली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या हस्ते नेते बाळासाहेब मगर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ ही भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय शेतकरी संघटना असून अत्यंत उल्लेखनीय काम करीत आहे. बाळासो आप्पासो मगर यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. "शेतकरी, कष्टकरी तसेच समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करणार" असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मगर हे मातोश्री उद्योग समूह निमगाव (म.) आणि दूध संकलन केंद्र निमगाव ( म.) या संस्थांचे संस्थापक असून काँग्रेस (आय) पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

0 टिप्पण्या