🟥 मदत व पुनर्वसन मंत्री तसेच महसूल मंत्री यांनी चारा घोटाळ्यातील बिले देऊ नयेत - विठ्ठल राजे पवार

🟥 मदत व पुनर्वसन मंत्री तसेच महसूल मंत्री यांनी चारा घोटाळ्यातील बिले देऊ नयेत - विठ्ठल राजे पवार

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 21/7/2025 : "मदत व पुनर्वसन मंत्री तसेच महसूल मंत्री यांनी चारा घोटाळ्यातील बिले देऊ नयेत" असे मत शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  तथा जनहित याचिकाकर्ते विठ्ठल राजे पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  ते पूढे म्हणाले की बीड, सोलापूर अहमदनगर, सातारा व सांगली जिल्ह्यातील अनेक चारा छावणी चालकांची बिले काढून देण्याच्या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे. सदरची बाब ही न्यायालयातील असल्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच महसूल मंत्री यांनी कोणत्याही चारा छावण्याच्या संदर्भातील बिले देऊ नये दिल्यास संबंधितांविरुद्ध देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल असा इशारा संघटनेने मदत व पुनर्वसन मंत्री तसेच महसूल मंत्री यांना दिलेला आहे.

सदर बाबतचे निवेदन पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांना संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे सदर बाबतच्या निवेदनाची प्रत सोबत मुंबई उच्च न्यायालय राज्य शासनाचे सर्व आदेश प्रति देण्यात आलेल्या आहेत, सदरचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री आणि म्हसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक  विठ्ठल राजे पवार जनहित याचिकाकर्ते यांच्या वतीने दिलेले आहे, यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मगर, संघटनेचे कोकण विभाग संपर्कप्रमुख गिरीश शिंदे तसेच संघटनेचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, हडपसर विभागाचे अध्यक्ष महेश गिरी, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे, संपर्क प्रमुख दत्तात्रय पोंदे पाटील तसेच संघटनेचे राज्याचे युवक विद्यार्थी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार उपस्थित होते.

संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या संदर्भात पंधरा दिवसात माननीय विभागीय आयुक्त व संबंधित सोलापूर, अहमदनगर, बीड, सातारा, सांगली जिल्हाधिकारी यांनी चारा छावण्यातील घोटाळेबाज बहादरांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई न केल्यास सदरबाबत सर्वोच्च अथवा सुप्रीम न्यायालयात कंटेंट ऑफ कोर्ट, न्यायालयाचे आदेशाचा व शासन आदेशाचा अवमान करणे कर्तव्यात कसूर, दप्तर दिरंगाई व नागरिकाची सनद कायद्यान्वये कन्टेन्म्ट ऑफ कोर्ट दाखल करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने जनहित याचिकाकर्ते, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या