🟨 मनाची शुद्धता

🟨 मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 04/07/2025 :

दैनंदिन जीवनात आपल्यावर काही ना काही "संकट" येत असते. लहान-मोठे, किरकोळ-गंभीर कशाही प्रकाराचे ते असू शकते. कधी आपण सहजासहजी त्यावर मात करतो तर कधी कोणाचे सहकार्य घ्यावे लागते.

"संकटकाळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र" असे आपल्याकडे म्हटले जाते. घरातील लोक, नात्यातील लोक यापेक्षा मित्र परिवार जास्त कामी येतात. असे असले तरी शक्यतो आपला कणखरपणा वाढवून  आपणच त्यातून बाहेर पडणे कधीही योग्य.

संकटे सांगून येत नाहीत. अशा वेळेस आपल्या क्षमता तपासून पहाव्यात. खचून जावू नये. 'आपल्या पंखातील बळ तपासून पाहण्याची हीच संधी आहे!' या सकारात्मक भावनेतून  संकटाकडे पाहिले तर मार्ग सापडतील.

आजचा संकल्प

_कोणतेही संकट अडचण न मानता एक आव्हान समजून त्याला सामोरे जाऊन समस्येची उकल करू. शांत डोक्याने विचारपूर्वक कृती करून त्यातून मार्ग काढू._

सौ. स्नेहलता स. जगताप._

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या