🟣 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 07/07/2025 :
आपल्या मित्र परिवारात वावरताना इतरांशी नको त्या गोष्टीत तुलना करू नका. आपली, आपल्या पालकांची परिस्थिती विसरून चालणार नाही. दुसऱ्याने सरी घातली म्हणून आपण दोरी घालून जमणार नाही.
याच्याकडे भारी पेन आहे, त्याचे कपडे, त्याचे शूज व अशाच अनेक किंमती वस्तूंना पाहून त्यांच्या बरोबर तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. मला तसेच पाहिजे म्हणून बाबांच्याकडे हट्ट करू नका अन् नाही मिळत म्हणून नाराज होऊ नका.
त्यापेक्षा बौद्धिक प्रगती साधा. स्वतःला घडवत रहा. आपले लेखन, वाचन, पाठांतर, वक्तृत्व, कला-क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करा. आपल्या या गुणांच्या जोरावर नाव कमवा. पालकांचे नाव मोठे करा.
भौतिक गोष्टींच्या मोहात पडण्यापेक्षा शाश्वत गुणांचे संवर्धन करा.
जयहिंद! 🇮🇳
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या