🟪 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/07/2025 :
हाती-पायी धड असलेली एखादी व्यक्ती भीक मागत असेल तर तुम्हाला काय वाटेल?याला कष्ट करायला नकोत म्हणून भीक मागून जगतोय, असा विचार तुमच्या मनात येईल का नाही? (त्याचीही कारणे वेगवेगळी असू शकतात.)
आपण मग यातून काय शिकायचे? तर स्वतः जवळ असलेल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तीचा पुरेपूर वापर करून एक यशस्वी विद्यार्थी घडण्याचे सत्कर्म करायचे.
मुलांनो, शाळेत वर्गात शिकवताना पूर्ण लक्ष दिले व घरी मनापासून सराव केला तर आपल्याला पेपर सोडवताना कोणाचीच मदत लागणार नाही. कॉपी करणे, विचारून लिहिणे ही एक प्रकारची भीक मागणेच नव्हे का?
स्वतःच्या बुद्धीचा योग्य व प्रामाणिक उपयोग करा व स्वतःच्या पायावर उभे रहा.
जयहिंद!🇮🇳
सौ. स्नेहलता स. जगताप
0 टिप्पण्या