🟩 रत्नत्रय इंग्लिश स्कूलच्या बाल दिंडी ने दुमदुमली सदाशिवनगरी !

🟩 रत्नत्रय इंग्लिश स्कूलच्या बाल दिंडी ने दुमदुमली सदाशिवनगरी ! 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 06/07/2025 :

रत्नत्रय इंग्लिश मिडीयम व ज्युनिअर कॉलेज मांडवे यांची बालदिंडी  उत्साहात पार पडली. सदाशिवनगर मधील शहा ब्रदर्स पासून प्रारंभ होऊन रत्नत्रय इंग्लिश मिडीयम स्कूल मांडवे पर्यंत ही दिंडी काढण्यात आली.

यामध्ये नर्सरी ते बारावपर्यंतच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता तसेच  घोडा,टाळ, मृदंग,वीणा, डोक्यावर तुळशी, लेझीम,पताका, कपाळावर गोपीचंद, वारकरी पोशाख, विठुरायांच्या गजरात तल्लीन झालेले हे सर्व पाहून साक्षात् पंढरीच्या वारीचा अनुभव येत होता. या दिंडीचा मनमुराद आनंद आमचे सर्व विद्यार्थी ,पालक, शिक्षक संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मार्गदर्शक, सर्व कमिटी मेंबर घेत दिंडीत सहभागी झाले होते.

यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, जनाबाई या वेषभुषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. मुलींनी कास्टा साड्या नेसून डोक्यावर तुळशी घेतल्या होत्या. तसेच मुलांनी वारकरी पोशाख परिधान केला होता व हातात भगवी पताका कपाळावर गोपीचंद गळ्यात टाळ मृदंगाच्या गजरात हा दिंडी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. 


शाळेत दिंडी पोहचल्यावर मुलांनी गोल रिंगण तयार केले. घोड्याचे गोल रिंगण पार पडले आणि सर्व मुलींनी ऋमैदानावर फुगड्या खेळल्या. अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. या दिंडीत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय  अनंतलाल दादा दोशी , मार्गदर्शक सदाशिवनगर गावचे सरपंच वीरकुमार दोशी, सचिव प्रमोद दोशी मार्गदर्शक विरकुमार दोशी, सहसचिव अभिजीत दोशी , मार्गदर्शक अजितकुमार‌ दोशी, रामदास भाऊ कर्णे, तुषार गांधी , अजय गांधी, बाहुबली दोशी, प्रशांत दोशी, सुरेश धाईंजे, तनोज शहा, सानप भाऊसाहेब, ज्ञानेश राऊत , रामदास गोपणे ,पार्वती जाधव, सोमनाथ राऊत इत्यादी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या