🟢 मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 04/07/2025 :
पालक म्हणून आपल्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यातील महत्वाची एक म्हणजे मुलांवर "संस्कार" करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. संस्कारी मुले ही कुटुंबाची तशी देशाची पण संपत्ती आहे.
संवेदनशील, प्रामाणिक, नम्र, हुशार, जिद्दी, कष्टाळू, कणखर प्रवृत्तीची मुले परिस्थितीशी मुकाबला करतात. संकटांवर मात करतात. चिकाटीने व बुद्धीचा वापर करून समस्या सोडवतात. ती कोणाकडून अपेक्षा करत नाहीत, स्वावलंबी असतात.
अशा मुलांचे पालन पोषण करण्यासाठी संस्कार महत्वाचे ठरतात. पालक म्हणून मुलांना संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा वर सांगितल्याप्रमाणे संस्कार जर केले तर ती संपत्ती चोरली जाणार नाही उलट पिढ्या न पिढ्या वृद्धिंगत होईल.
आजचा संकल्प
आपल्या संस्कारातून मुलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वासाने प्रसंग हाताळण्यास शिकवू. त्यांची निर्णयक्षमता बळकट करून त्यांना प्रयत्नवादी बनवू._
सौ. स्नेहलता स. जगताप._

0 टिप्पण्या