🟢 मनाची शुद्धता

 

🟢 मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

 दिनांक 02/07/2025 : 

जबाबदारी  हा शब्द ऐकला किंवा वाचला तरी मनामध्ये सकारात्मक भावना येतात. चांगल्या-वाईट अनुभवातून किंवा प्रसंगातून भले होईल किंवा व्हावे यासाठी प्रयत्नशील राहणे म्हणजे जबाबदारी.

आपली वैयक्तिक जबाबदारी असते तशी कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पण असते.आपले शिक्षण, नोकरी-व्यवसाय, कुटुंब व्यवस्थित सांभाळणे, त्यामध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणे म्हणजे एक चांगली जबाबदारी पार पाडणे.

जी व्यक्ती जबाबदारीने वागते त्यांना भरपूर समस्यांना सामोरे जावे लागते. अडचणी येतात क्वचित मुद्दाम आणल्या जातात. नकारात्मक शक्ती मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. हा लढा नेहमीच यशस्वी होतो असे नाही. त्यावर मात करत प्रयत्नशील रहावे लागते.

आजचा संकल्प

जबाबदारीने वागताना अनुभव वाढतो. आपल्याला विरोध करणाऱ्या निंदकांच्याकडे लक्ष न देता, आलेल्या अनुभवातून आपले ध्येय गाठू व स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करू._

सौ. स्नेहलता स. जगताप



            संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या