मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपुरात गो-आधारित नैसर्गिक शेती स्टॉलला भेट

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपुरात गो-आधारित नैसर्गिक शेती स्टॉलला भेट 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 08/07/2025 : पंढरपूर येथे  आषाढ वारी निमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन मध्ये  गो-आधारित नैसर्गिक शेती स्टॉलला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

त्यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ स्थापन व्हावे व प्रत्येक शेतकऱ्याला  देशी गाईच्या चाऱ्यासाठी अनुदान देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले तसेच गो-निविष्ठा, खते,गोकृपामृत याविषयी मुख्यमंत्री यांनी माहिती घेतली. नैसर्गिकरित्या पिकवलेली फळे, पंचगव्य उत्पादन मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आली.

याप्रसंगी कृषिमंत्री  माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री  जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषिभूषण जगन्नाथ मगर, आचार्य ज्ञानेश्वर शिंदे, कृषिभूषण  शशिकांत पुदे,खुशालचंद मोरे,प्रमोद इंगळे, संतोष सुरवसे, रविंद्र डोंबे, कैलास कुरे, मते महाराज आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या