बाळासाहेब मगर यांचा निमगाव (म.) ग्रामपंचायत मध्ये सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक20/7/ 2025 : निमगाव (मगराचे) तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासो अप्पासो मगर यांची शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आणि आणि राज्य कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल निमगाव (म.) ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच सुभाष रामचंद्र साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघावर मला मिळालेल्या तिहेरी पदनियुक्तीचे श्रेय महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना देत आहे कारण त्यांनी माझ्या नावाची शिफारस राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्याकडे केली होती. महासंघाच्या पुणे स्थित मुख्य कार्यालयांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या उपस्थितीमध्ये पद नियुक्तीचे पत्र मिळाले. मला मिळालेल्या या पदांच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जास्तीत जास्त विधायक काम करण्याची या निमित्ताने आपणास ग्वाही देत आहे असे मत या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त पदाधिकारी बाळासाहेब मगर यांनी म्हटले.
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला पोलीस पाटील सौ सविता मगर पाटील, कृषी विभागा च्या सौ. सावंत, ग्रामविकास अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या