संपादकीय पान..........✍️
एका स्त्रीची सगळ्यात मोठी शक्ती.........?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 01/07/2025 :
असं म्हणतात की एका स्त्रीची सगळ्यात मोठी शक्ती तीच प्रेम असतं पण वास्तवात तिची खरी ताकद असते ते म्हणजे तीचं मौन, तिची नजर, तिचा आत्मसन्मान आणि तिचं स्वातंत्र्य. जगाने तिला एक तर भावनिक किंवा दुबळी समजलं पण जेव्हा एक स्त्री मौन राहून बोलण शिकते, स्वतः त्रासात असून हसणं शिकते आणि स्वतःला निवडायला शिकते तेव्हा ती फक्त ताकदवरचं नसते तर ती कोणत्याही नात्यांचा रुपरंग बदलू शकते.
बरेच पुरुष ह्या भ्रमात असतात की ते एका स्त्री वर नियंत्रण मिळवू शकतात.. कधी प्रेमाने कधी सक्तीने कधी दिखाव्याने परंतु ते हे विसरतात की एका स्त्री ची खरी शक्ती तेव्हा समोर येते ज्यावेळी ती निरपेक्ष होते, ती तेव्हा त्या पायरीवर उभी असते जिथं तिला कुणाला मनवायची समजून सांगण्याची रडण्याची गरज पडत नाही.. त्यावेळी ती त्या उंचीवर येऊन पोहचते जिथं अहंकारी पुरुष स्वतःला ठेंगना समजू लागतो. त्या स्त्रीची ताकद अमर्याद असते.. ती ताकद कुणाला हानी करत नाही तर समोरच्याला स्वतःच्या चुकीवर विचार करण्यास भाग पाडते. ती ताकद ना शस्त्र असते ना कोणती जादू.. ती स्त्रीच्या अंतरमनातली चेतना, अनुभव, आत्मबळा तुन निघालेली असीम ऊर्जा असते जी कोणत्याही पुरुषाला आतून हेलावून टाकू शकते.
जेव्हा एक स्त्री स्वमग्न समाधानी होते तेव्हा तिला समजवायला कुणीचं उरत नाही तेव्हा ती स्वतःचं स्वतःसाठी मार्ग बनवते आणि ह्या मार्गात तिला सोडून जाणारा आयुष्यभर पश्चाताप करत राहतो.
जेव्हा एक स्त्री मौन होते ह्याचा अर्थ असा नाही की तिच्याजवळ बोलायला काही नाही ह्याचा अर्थ असा असतो की तिची इच्छा असूनही ती बोलत नाही.. तिचं मौन सामान्य नसते तर ते अनगिनत तुटलेले स्वप्न.. दाबून टाकलेल्या अपेक्षा विखूरलेले शब्द आणि थकलेल्या आशा असतात.
स्त्री जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा तेव्हा ती नात्याला वाचवण्यासाठी बोलते.. ती वारंवार माफ करते, वारंवार समजाबते वारंवार प्रयत्न करते की आज उद्या सगळं नीट होईल पण जेव्हा तिच्या गोष्टी लक्षात येऊ लागतात.. तिच्या शब्दाला काही महत्व नाही तिच्या भावना समोरच्यासाठी शून्य किमतीच्या आहेत तेव्हा मात्र ती माघार घेते.. ती मौन होते.
तिचं मौन तो आरसा आहे ज्यात समोरचा स्वतःच स्पष्ट प्रतिबिंब पाहू शकतो आणि मनन करू शकतो की पहिल्यांदा चूक नेमकी कुठं झाली.. स्त्री चं मौन एक खोल खाई सारखं असतं जेव्हा ती चूप राहते तेव्हा तिच्या शब्दाचं ओझं समोरच्याला जाणवतं आणि समोरचा विचार करायला लागतो की काय झालं होतं.. काय बोललो होतो.. काय केलं होतं मी ?? म्हणून ती मला काहींचं बोलण्याच्या लायक समजतं नाही. हे मौन अचानक येतं नसते ते हळूहळू दबक्या पावलांनी येते आणि स्वाभिमानापेक्षा उंच होऊन जातं .. आणि त्यावेळी समोरचा पुरुष कधी काळी स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचा तो स्वतःला असाहाय्य समजू लागतो कारण आता त्याच्याजवळ तिच्याकडून ऐकायला काहींचं उरत नाही, उत्तर देण्यासाठी समोर कुणीचं नसतं आणि समोर ती स्त्री असते जीला आता कुणाला गमावण्याची भीती वाटत नाही.
ज्यादिवशी एक स्त्री मौन होते त्यादिवशी पासून तिचा आत्मसन्मान बोलू लागतो आणि हेचं मौन एका पुरुषाला तिच्यासमोर गुडघ्यावर आणण्यासाठी पुरेसं आहे.
मौन एक शक्ती आहे जी कुण्या वादाला जन्म देणारी नाही तर पूर्ण नात्याची दिशा बदलणारी असते.. ती आरोळी नसते पण तिचा परिणाम एका शक्तिशाली वादळासारखा असतो.
♈9326365396♈
0 टिप्पण्या