रत्नत्रय परिवाराने जोपासली 21 वर्षीय अखंड अन्नदानाची परंपरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 03/07/2025 :
दिनांक १ जुलै मंगळवार दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चे सदाशिव नगर मध्ये आगमन झाले. वारकऱ्यांना घरगुती जेवणाचा आस्वाद मिळावा या हेतूने रत्नत्रय परिवार गेल्या 21 वर्षांपासून ही अन्नदानाची परंपरा जोपासत आहे. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, रत्नत्रय पतसंस्था चेअरमन व सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच विरकुमार दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद दोशी, रत्नत्रय परिवाराच्या सौ. मृणालीनी दोशी, सौ. पुनम दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांनी झुणका भाकरी,ठेचा,लोणचे तसेच रत्नत्रय परिवारातर्फे बिस्कीट, राजगिरा लाडू इत्यादी वाटप करण्यात आले. यावेळी सचिव ज्ञानेश राऊत, निर्जरा दोशी, रत्नेश दोशी, पुष्कर दोशी, श्रुती दोशी, चंद्रकांत तोरणे, रत्नत्रय इंग्लिश मिडीयम व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, विलासचंद्र एम मेहता, दहिगाव चे प्राचार्य गजेश जगताप, माने, विक्रम पालवे, गोरे ,नाळे , सचिन पालवे, सागर रणदिवे इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या