🟩 फ्रेडरिक ऑर्टेल : ज्याने आपल्या घराचे नाव "सारनाथ" ठेवले

🟩  फ्रेडरिक ऑर्टेल : ज्याने आपल्या घराचे नाव "सारनाथ" ठेवले 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 01/06/2025 : आजच्या भारताचे राष्ट्रचिन्ह म्हणजे राजमुद्रा ब्रिटिश अधिकारी फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल यांनी शोधले. हे प्रतीक सारनाथ मधल्या अशोक स्तंभा वरून घेण्यात आले. याचे शोध घेण्याचे श्रेय ऑस्कर ऑर्टेल यांना जाते. ऑर्टेल हा जर्मनीतील हॅनोव्हर या गावचा होता. मात्र हा ब्रिटिश सरकारसाठी काम करणारा सिव्हिल इंजिनिअर आणि आर्किटेक्ट होता. त्या काळच्या थॉमसन कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे  आताच्या आय आय टी रुरकी मध्ये याचे शिक्षण पूर्ण झाले. मग याने काही वर्षे रेल्वे मध्ये, तर काही वर्षे PWD मध्ये काम केले. १९०३ मध्ये ऑर्टेलचे वाराणसी (उत्तरप्रदेश) मध्ये अधीक्षक अभियंता पोस्टिंग झाले. तेव्हा तिकडे जवळच सारनाथ मध्ये पुरातत्व विभागाचे काम सुरू होते. या कामात भाग घेण्याची परवानगी ऑर्टेल ने मिळवली. 

डिसेंबर १९०४ मध्ये त्याने थंडीच्या कडाक्याच्या  हिवाळ्यात उत्खननाला सुरुवात केली. या उत्खननात एकूण ४७६ शिल्पे, ४१ शिलालेख आणि इतर वस्तू मिळाल्या. मात्र यातील सर्वात महत्वाचे म्हणजे १५ मार्च १९०५ मध्ये सापडलेला अशोक स्तंभ. साधारण अडीच हजार वर्षापूर्वी मौर्य साम्राज्याच्या सम्राट अशोक ने उभारलेल्या या स्तंभाचा शोध लागणे ही भारतासाठी अतिशय महत्वाची गोष्ट ठरली. २६ जानेवारी १९५० रोजी देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. ही राजमुद्रा संविधानाच्या मुखपृष्ठावर आहे, तसेच संसदेच्या शीर्षभागी आहे. या राजमुद्रेवरचे सिंह आक्रमक नाहीत, ते शूर आहेत, नम्र आहेत आणि भारताच्या आत्मविश्वासपूर्ण वाटचालीचे द्योतक आहेत.  

पुढे १९२१ मध्ये फ्रेडरिक ऑर्टेल मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले, आणि पुन्हा इंग्लड येथे टेडिंग्टन येथे राहू लागले. ते त्या चार मुखी सिंहाच्या प्रतीकावर एवढे प्रभावित झाले की, त्यांनी आपल्या घराचे नाव 'सारनाथ' ठेवले, जे सारनाथ यांच्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे.

©️ संकलन/लेखन : मिलिंद पंडित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या