शिवभक्त आकाश भाग्यवंत नायकुडे यांचे
श्री केदारनाथ चरण स्पर्श दर्शन संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 19/5/2025 : रविवार दिनांक 18/5/2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास उत्तराखंड राज्यातील श्री केदारनाथ मंदिर येथे साप्ताहिक अकलूज वैभव चे कार्यकारी संपादक आणि पाक्षिक वृत्त एकसत्ताचे उपसंपादक आकाश भाग्यवंत नायकुडे (सॉफ्टवेअर इंजिनियर, मुंबई) दर्शन घेण्यास पोहोचले. दर्शन रांग मोठी असल्याने त्यांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेतला. आज सोमवारी पहाटे त्यांनी शिवालयात (मंदिरात) जाऊन चरणस्पर्श दर्शनाचा लाभ घेतला, त्यासाठी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास आकाश नायकुडे दर्शन बारीत उभे राहिले होते.
गौरीकुंड ते श्री केदारनाथ मंदिर हा डोंगर चढत जाण्याचा पायी प्रवासाचा (22 -24 किलोमीटर) अत्यंत अवघड टप्पा पार करण्यासाठी जवळपास 12 तासाचा अवधी लागला. त्यासाठी पहाटे 4:15 वाजलेपासून त्यांनी पायी प्रवासास सुरुवात केली होती.
"आम्हाला तुझा अभिमान वाटतो" अशा शब्दात सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (संस्थापक संपादक, साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता) यांनी आपल्या मुलाचे कौतुक केले. जय श्री केदारनाथां चे चरणस्पर्श दर्शन घेतल्यानंतर भ्रमनध्वनी द्वारे पिता-पुत्र एकमेकांशी ते बोलत होते.
2 टिप्पण्या
अभिमान वाटावा असे काम समाजात आपण आणि आपले चिरंजीव करीत आहात. आपल्या निर्हेतुक कार्याला सलाम आहे
उत्तर द्याहटवासर , आपण आणि आपले चिरंजीव आकाशजीचे समाजात निर्हेतुक कार्य आहे. आकाशजीना श्री केदारनाथ सुख समाधान , ऐश्वर्य, धन दौलत आणि निरोगी आरोग्य देवो हीच प्रार्थना
उत्तर द्याहटवा