प्रताप क्रीडा मंडळाचे उन्हाळी कला, क्रीडा प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

 

प्रताप क्रीडा मंडळाचे  उन्हाळी कला, क्रीडा प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 30/04/2025 : प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व अध्यक्षा कु. स्वरूपारांणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने दि.२६ ते २९ एप्रिल या कालावधीत आयोजित केलेल्या मोफत उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराला खेळांडूनी उदंड प्रतिसाद दिला. 

         सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, शंकरनगर येथे आयोजित केलेल्या या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले -पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सचिव बिभीषण जाधव, वेटलिफ्टिंग खेळातील राष्ट्रीय खेळाडू अक्षय कट्टीमनी, संजय झंजे, संचालक भीमाशंकर पाटील, राहुल गायकवाड, विशाल लिके, खजिनदार सुहास थोरात, सहाय्यक फिरोज तांबोळी, मंडळाचे सदस्य, खेळाडू,कलाकार, पालक  आदी पस्थितीत होते. 

या शिबिरात विविध क्रीडा प्रकारासाठी २५३ खेळाडू व कला प्रकारासाठी  ७९ विद्यार्थी असे एकूण ३३२ मुलां, मुलींनी सहभाग घेतला त्याबद्दल खेळाडू व पालकांचे आभार मानले

या शिबिरामध्ये क्रीडा प्रकारात वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी, योगासने या खेळांचे व कला शिबिरामध्ये काच काम (ग्लास पेंटिंग) व माती काम (क्ले वर्क) या कलेचा समावेश करण्यात आला होता.    

       


 उन्हाळी क्रीडा व कला शिबीरास क्रीडा शिबिरास यशवंत माने देशमुख, खंडाप्पा कोरे, अनिल मोहिते, ए व्ही बनसोडे,  एस.व्ही.चव्हाण, डी.ए. सय्यद , टी.वाय. शिंदे ,एच.डी. साळुंखे , एस.डी.राऊत ,बी.बी. पाटील , यू.एम. भिंगे , आर.एस.लोंढे, एच.पी. वाघमोडे, पी.एस.पांढरे , ए.व्ही.बनसोडे, एन.डी.बनजगोळकर, एस.एस.पाटील तर कला प्रशिक्षणासाठी तानाजी काशीद, धन्यकुमार साळवे, विशाल लिके, दत्तात्रय शिंदे, सिद्धनाथ टिंगरे, शामराव कुंभार, शशिकांत पिसे, माधुरी भांगे यांनी प्रशिक्षण दिले. 

या शिबिरास खेळाडू व कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सचिव बिभीषण जाधव आणि क्रीडा प्रमुख यशवंत माने देशमुख यांनी  खेळाडू, कलाकार व पालक यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या