ओंकार साखर कारखाना परिवाराला शुगर आनलॅसीस एक्सलन्स पुरस्कार प्रदान
वृत्त एकसत्ता न्यूज
निमगाव प्रतिनिधी दिनांक 05/03/2025 : ओंकार साखर कारखाना परिवाराला इंटरनॅशनल द शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ इंङिया यांच्या वतीने "शुगर एनालिसिस एक्सलन्स पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे सभारंभपुर्वक संस्थेचे प्रेसिडेंट मार्टिन व संजय आस्वाकी यांच्या हस्ते ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साखर कारखानदारी म्हणजे न परवङणारा, नेहमी अङचणीत असणारा, समस्यांचा ङोंगर असणारा व्यवसाय असे याकडे पाहिले जाते. माञ ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील, ओमराजे बोञे पाटील यांनी हे आव्हान गेल्या पाच वर्षां पुर्वी स्वीकारले. आर्थिक ङबघाईल आलेले साखर कारखाने ताब्यात घेतले. फक्त ताब्यात न घेता उपपदार्थ प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण करून गाळप झालेल्या ऊसाचे वेळेत पैसे दिले. बंद असलेला कारखाना सुरू झाल्याने त्या भागाचा कायापालट झाला. अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ऊस कारखानदारी बरोबर ओंकार साखर कारखाना परिवाराने सामाजिक क्षेञात भरीव योगदान दिले. जि प शाळांना निधी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व स्वेटर वाटप, निराधार लोकांना अन्नधान्य वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, माहिलांचा कारखाना स्थळावर सन्मान या सारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत . याची दखल घेऊन केंद्रीय मंञी नितिन गङकरी व मान्यवरांनी या पुर्वी परिवाराचे कौतूक केले याची.दखल घेऊन
इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला या बद्दल ऊसउत्पादक शेतकरी कर्मचारीवर्गांने बोञे पाटील यांचे अभिनंदन केले.
फोटो : ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील हे पुरस्कार स्वीकारताना
0 टिप्पण्या