वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/03/2025 : महाराष्ट्रात जातीय विद्वेष निर्माण करणाऱ्या काही संघटना मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांच्या द्वारे समाजाला ऐकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या संतांची जातिजाती मध्ये विभागणी करुन समाजात फुट पाडली जाते किंवा चुकीचे संभ्रम निर्माण केले जातात विद्वेषी संघटनाची पिलावळ संताच्या जयंती, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बिळा मधुन पटापट बाहेर पड़ून संताना जातीपाती मध्ये विभागणी करण्याची किंवा संभ्रम निर्माण करण्याची स्पर्धा सुरु होत असते. फाल्गुन द्वितीया तुकाराम बीज उत्सव इंग्रजी तारखे नुसार दि.१६ मार्च रोजी आहे. तुकाराम बीज उत्सव निमित्ताने सुध्दा काही समाज विघातक मंडळी व्याख्यान,समाज माध्यम व प्रसार माध्यमा द्वारे संत तुकोबा विषयी समाजात मोठ्या संभ्रम निर्माण करणारे लेखन, साहित्य प्रसारीत करुन समाजाची दिशाभूल केली जाते " तुकोबांची हत्या की वैकुंठ गमन की हत्या" तुकोबांनी वेद,देव,व्रतवैकल्य वैदिकधर्म नाकारला होता अशा प्रकारची खोटी मांडणी करून समाजात विद्वेष निर्माण केला जातो या पूर्वी डॉ.आ.ह.सांळूखे यांनी"विद्रोही तुकाराम"पुस्तकाद्वारे "वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम" समाजात प्रस्तुत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे पुरुषोत्तम खेडेकर यांनी सुद्धा तुकोबांनी वैदिक विचारा विरुद्ध बंड पुकारल्याचे सांगुन सदेह वैकुंठगमनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तुकोबांची हत्या झाली असल्याचा विषय प्रस्तुत करुन वारकरीबंधू मध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण वारकरीबंधुनी दोघांच्या पुस्तक व विचाराला कवडीचीही किंमत दिलेली नाही त्यांचे विखारी विचाराला मूठमाती दिली आहे.त्यामुळे तुकोबा वैदिक की विद्रोही यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आ.ह.सालुंखे मराठा सेवा संघ व पुरुषोत्तम खेडेकर यांचे सोबती असून त्यांनीं काही वर्षा पूर्वी आपल्या "विद्रोही तुकाराम" पुस्तका द्वारे "वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम"प्रस्तुत करून त्यांनी धर्म शास्त्रा विरुद्ध बंड पुकारले होते असे चित्र उभे केले होते आणि त्यांची पिलावळ आता समाजाला वैदिक सणउत्सव,व्रत वैकल्य, पूजापाठ थोतांडअसून सर्व सोडण्याचे षड़यंत्र करून समाजाची,वारकरी बंधूची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात तसेच पंढरपुरच्या वारीत वारकरी,टाळकरी,तुकोबावर श्रध्दा ठेवणारे,संत रामदास व ज्ञानोबा माऊली वर श्रध्दा ठेवणारे असे वाद निर्माण करुन "ज्ञानदेव तुकाराम ऐवजी नामदेव तुकाराम"चा जयघोष करण्याचा अट्टहास सुद्धा केला जातो पण त्यांचा हा षड़यंत्रचा प्रयोग वारकरी बंधुनी हाणून पाडलेला आहे त्यामुळे तुकोबांनी वैदिक धर्म वेद,व्रत वैकल्य,पंढरपुरचा विठ्ठल संबधी काय म्हणतात याचा विचार करावा लागेल. तुकोबा म्हणतात-
आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ! तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिकेसमान!! कंठी मिरवा तुळसी! व्रत करा एकादशी!म्हणवा हरीचे दास,तुका म्हणे मज हे आस !! मुखाने विठ्ठल नामस्मरण करावे म्हणजे आपण सुखी होतो गळ्यात तुळशी माळ मिरवा,एकादशी व्रत करा असा संदेश निर्वाळा तुकोबांनी व्रतवैकल्या संबधी दिलेला आहे व्रतवैकल्यासाठी जेवढे आग्रही होते तेवढेच हरी कथे विषयी सुद्धा आग्रही होते हरीकथे विषयी तुकोबा म्हणतात हरी कथे नाही,विश्वास ज्याचे ठायी!त्याची वाणी अमंगळ, कान ऊंदराचे बिळ ! सांडूनी हा रस ,करिती आणीक सायास !!तुका म्हणे पीसी वाया गेली किती ऐसीं !! ज्याला हरिकथे विश्वास नाही त्याची वाणी अमंगळ समजावी व त्याचे कान उंदराचे बिळ समजावे हरिकथेतील रस टाकून इतर ठिकाणी जे रममाण होतात ती वेडी माणसे आहेत तात्पर्य तुकोबांनी हरिकथे वर ज्यांचा विश्वास नाही अशांना वेडे म्हटले आहे तुकोबांची हरिकथे वर अत्यंत श्रध्दा होती मग तुकोबांचा हरी कोण? तुकोबांचा हरी पंढरपूरचा विठ्ठल होता,तुकोबा म्हणतात.
न सोडी न सोडी न सोडी,विठोबा चरण न सोडी! भलते जड पड़ो भारी, जीवावर आगोज! शतखंड देह शस्त्र धारी,करिता परी न भिये! तुका म्हणे केली आधी, दृढ बुध्दि सावध!! तुकोबांचा हरी व दैवत विठ्ठल होते आणि ते म्हणतात शस्त्राने माझ्या देहाचे तुकडे जरी केले तरी विठ्ठल सोडणार नाही असा दृढ निश्चय व्यक्त करुन विठ्ठलाचे वर्णन "वेदशास्त्रमाहेर" करतांना म्हणतात- चारी वेद जया साठी, त्याचे नाम धरा कंठी!अठरा पुराणांचे पोटी, नामा विण नाही गोठी ! गीता जेणे उपदेशिली,ते ही विटेवर माऊली ! वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाचि साधला! विठोबासी शरण जावे, निज निळे नाम गावे! विटेवरी समचरण,तो हा रुक्मिणीरमण! वेद शास्त्रा माहेर, केले दासा उपकार!! चार वेद,सहा शास्त्रे,अठरा पुराण,शास्त्राचा सार आणि वेदाची मूर्ति असलेला विठ्ठल माझा प्राण सखा संगाती आहे ज्यांनी गीतेचा उपदेश केला तोच वेदशास्त्र माहेर रुक्मिणीरमण विटेवर उभी असलेली माऊली आहे तुकोबांनी वेदशास्त्र माहेर म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल अशी भूमिका घेतली आहे त्यामुळेच तुकोबांना विद्रोही तुकाराम ठरवीने मूर्खपणा म्हणावा लागेल वेदा संबधी कठोर भूमिका घेतांना तुकोबा म्हणतात मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते!वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ! तुकोबांनी उपरोक्त अभंगा मध्ये वेदाची निंदा करणाऱ्यांस भ्रष्ट, सुतक्या,खळ व मातेची स्तन फाडणारा म्हटले आहे. पुढे तुकोबा म्हणतात वेद जया गाती, आम्हा तयाची संगति! वेदा चे गुणगान करणाचीच आम्हाला संगती होऊ शकते असे निक्षून सांगून तुकोबा म्हणतात -वेद श्रुति ग्रंथ ज्या प्रमाण ,श्रेष्ठाचे वचन न मानी तो ! तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिवा नये! तुकोबांचे वेद,व्रतवैकल्य,संबंधी भाष्य वाचल्या नंतर तुकोबांना विद्रोही व वैदिक धर्मा विरुद्ध बंड करणारे अशी प्रतिमा उभी करून वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम अशी प्रतिमा उभी करण्या साठी कशी बदमाशी चालू आहे हे लक्षात येते. शेवटी "वैदिक तुकोबांची विद्रोही तुकाराम" अशी प्रतिमा का उभी करण्यात येत आहे याची मीमांसा करणे आवश्यक आहे.
अशोक राणे,अकोला.
भ्र.९४२३६५८३८५

0 टिप्पण्या