🟣 "शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला बेस रेट गॅरंटी हमीभावासाठी ३१ दिवसांचे 'राष्ट्रीय किसान संवाद यात्रा सत्याग्रह' आंदोलन" - राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/03/2025 :
"शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला बेस रेट गॅरंटी हमीभावासाठी ३१ दिवसांचे 'राष्ट्रीय किसान संवाद यात्रा सत्याग्रह' आंदोलन होणार अशी घोषणा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांची पुणे येथून केली असल्याची माहिती शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे ( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली) यांनी सांगितली.
"महाराष्ट्र राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अत्यंत गंभीर विषय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील यासाठी., शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनींना सुखाने सन्मानाने जगता यावे भारतीय घटनेचा अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी, "उत्पादक कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे., तो शेतकऱ्यांना मिळवून देत सरसकट कर्जमुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारसह केंद्र सरकारला भाग पाडवे लागेल. यासाठी "शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, व "एनयूबीसी महासंघाच्या रणरागिणी 'राष्ट्रीय अध्यक्ष एस गीता दीदी तामिळनाडू, एस सुवर्ण कुमार केरल, राजपाल मिना राज्यस्थान, सुब्रतो मोदक कलकत्ता, तत्कालीन खासदार बुद्ध सेन पटेल मध्य प्रदेश, टी रामाप्पा तेलंगणा, प्रोफेसर मीनाक्षी पाटील अध्यक्ष कर्नाटक राज्य, शुभांगी आईवळे, मोतीलाल मेगेरी कर्नाटक, जयराम राव मराठे नीलिमा देसाई गुजरात, यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ''तेलंगणा राज्यापासून ते कर्नाटक- गोवा- महाराष्ट्र - मध्य प्रदेश- गुजरात -राजस्थान -उत्तर प्रदेश- हरियाणा- पंजाब - ते दिल्ली,, असा एक महिन्याचे संघटनेच्या वतीने, "राष्ट्रीय किसान संवाद यात्रा,, या सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नियोजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराव पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली करण्यात आलेले असून या सत्याग्रह आंदोलनाचा ३१ दिवसांचा भारतातील किमान ११ ते १३ राज्यांमधील शेतकऱ्यांशी संवाद, भेटीगाठी घेत ३१ दिवसांचा प्रवास करत शेतकऱ्यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान, अर्थमंत्री, गृह सहकार मंत्री तसेच भारताचे कृषिमंत्री यांना व आदरणीय राष्ट्रपती भारत सरकार,, यांना समक्ष भेटून चर्चा करून शेतकऱ्यांच्या "सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, व सर्व प्रकारच्या शेतमालाला बेस रेट गॅरंटी हमीभाव मिळाला पाहिजे,, या संदर्भात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अकरा राज्यातील ३१ दिवसांच्या प्रवासानंतर दिल्ली येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ४ दिवसाचा राष्ट्रीय शेतकरी संवाद यात्रा आंदोलन सत्याग्रह करण्यात येईल. त्यानंतर सदर बाबतच्या मागण्यांचे निवेदन व थेट चर्चेसंदर्भामध्ये भारत सरकारला महाराष्ट्र, गुजरात राजस्थान हरियाणा मध्य प्रदेश व दिल्ली सरकारच्या माध्यमातून विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्त, व सर्व प्रकारच्या शेतमालाला बेस रेट अर्थात गॅरेंटी हमीभाव मिळाला पाहिजे तसेच भारताची अन्नसुरक्षा शाबीत ठेवण्यासाठी, भारतामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येक कलंक कायम स्वरुपी पुसून टाकण्यासाठी संघटनेच्या वतीने "राष्ट्रीय किसान संवाद यात्रा आंदोलनाचा,, महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
सदर बाबतचे नियोजन करण्यासाठी आज संघटनेच्या वतीने ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली या मिटींगला शेतकरी व एनयूबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी, गुजरात राज्याच्या महीला अध्यक्ष निलीमा देसाई, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भाग्यवंत ल. नायकुडे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप दिव्य वीर, सुभाष शेगर पुणे, सोलापूर - धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख, सातारा विभाग प्रमुख अमोल पिसाळ, राष्ट्रीय सचिव इनुस आलम सिद्दिकी, प्रदेश युवक विद्यार्थी अध्यक्ष राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीचं शेतमालाला बेसरेट गॅरंटी हमीभाव आठवा राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्व प्रकारचा शेतमाल बेसरेट गॅरंटी हमीभावाने खरेदी करून तशी पणन मार्फत विक्री व्यवस्था राबवावी या मागणीसाठी या "राष्ट्रीय किसान संवाद यात्रा सत्याग्रह" आंदोलनामध्ये २०ते २२ राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील तर समारोप आंदोलन हे दिल्ली येथील महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर होईल अशी माहिती राजे पवार यांनी दिली, महात्मा गांधी समाधीस्थळ येथील समारोप आंदोलना वेळी भारतातील सुमारे २२ ते २४ राज्यांमधील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी शेतकरी व सहभागी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होतील अशी माहिती विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
अशी माहिती संघटनेचे मराठवाडा विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रदीप दिव्यविर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



0 टिप्पण्या