कुठे गेले ते हरामखोर?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/03/2025 : कालपासून संतोष देशमुख यांचे फोटो सोशल मिडीयवार बघतेय.. रात्रभर शांत झोप सुद्धा लागली नाही. फोटो बघून पोस्ट बघून त्यांच्या भावाचा रडताना चा व्हिडीओ बघून सारखं रडायला येतंय..
कालपासून ज्या ज्या लोकांना फोटो बघून रडू आलं ते सर्व संवेदनशील मानवाची लक्षण..
कुठे गेले ते हरामखोर जे वाल्या चं समर्थन करत होते. वाल्या देव असल्याच सांगत होते. आधी हे सर्व एकजात धरून हाणले पाहिजे आणि यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे..
अरे माणूस म्हणून घेण्याच्या तरी लायकीचे आहात का तुम्ही?? इतक्या निर्दयी पणे तर कसाई सुद्धा कोंबडी, बकरी कापत नाही रे. अरे हरामखोरांनो तुम्ही खरंच माणसाच्या पोटचे तरी आहेत का रे?? अरे एकदा सुद्धा तुम्हाला त्यांची दया आली नाही ? एकदा सुद्धा त्यांची मुलं त्यांची आई तुमच्या डोळ्यासमोर आली नाही?? अरे किडे पडून मराल रे तुम्ही..
हे असले राक्षस असेच तयार होतं नाहीत तर सत्ताधाऱ्यांचा वरद हस्त, अमाप संपत्तीची पैशाची हाव, वर्चस्व गाजवण्याची, स्वतःला दादा, भाई समजण्याची विकृती हे असले राक्षस समाजात पैदा करते..
उघड उघड हे राक्षस समाजात फिरतात, राजकीय लोकांसोबत उठतात, बसतात, त्याचा उजवा हात - डावा हात म्हणून समाजात वावरतात आणि मग त्याचं मस्तीतून एखाद्या चांगल्या माणसाची हत्या करतात आणि अश्या अविर्भात राहतात की आमचं कोणीच काही वाकड करू शकत नाही. का?? तर हे राजकीय लोकांनी पोसलेले गुंड असतात. म्हणून जेव्हढे दोषी हे आरोपी आहेत तेव्हढेच दोषी तिथले राजकीय नेते.
खरंतर धनंजय मुंडेनी आपली नैतिकता शाबूत आहे हे आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यायला पाहिजे होते. पण जिथे फक्त सत्तेचा माज आहे तिथे नैतिकता कुठून असणार.
खरंतर मा.अजित पवार यांचे असे काय हात दगडाखाली अडकलेत की त्यांनी अजूनही त्यांचा राजीनामा घेतला नाही. अजित दादा कुठं घोड अडलंय??
उघड उघड दिसतंय की धनंजय मुंडे आणि वाल्या गँग चे किती घनिष्ठ संबंध आहेत. सर्व महाराष्ट्रात हे जगजाहीर झालंय. फक्त राज्याच्या मंत्रिमंडळाला ते दिसत नाहीये. तुमच्याच सत्ताधारी सरकार मधील आमदार खासदार त्यांचं पूर्ण पितळ उघड करतायेत तरी तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधल्याच सोंग घेताय..?
अहो तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर अशी वेळ आली असती, एखाद्याचा इतका निर्दयी पणे खून झाला असतात तर खरंच दोन महिने लागले असते का तपास करायला??
अरे बापघाल्यानो नुसतं लेकराच्या पायात काटा रुतला तरी आईच्या जीवाची घालमेल होते. तुम्ही तर तिच्या पोटचा गोळा हालहाल करून मारला रे! काय वेदना होतं असतील त्या माउलीला, काय म्हणत असतील त्यांची लेकरं..
कुठे गेले ते नामदेव सानप? अशी मानसिकता असते का रे बाबा?? अशी कोणती मानसिकता होती की तोंडात ल***वी करावी.? आता बोला की सानप. करा आव्हान तुमच्या त्या वाल्याच समर्थन करणाऱ्या औलादीना की आता जेलात घुसून असली नासकी औलाद संपवा आणि त्याच्या नीच कृत्याच्या समर्थनाच प्रायश्चित करा म्हणून.. अरे यांच्या पेक्षा जनावर बरी.
ह्या असल्या राक्षसी वृत्ती वेळीच ठेचल्या असत्या तर आज कित्येक संतोष देशमुख आमच्यात असते. ह्यांनी याआधी कित्येक खून पचवले कारण त्यांच्यावर आकाचा हात होता आणि म्हणून हे इतके विकृत झाले की यांना माणूस मारण म्हणजे मजा वाटू लागली, खेळ वाटू लागला, माणसाच्या मरणाचा हे आनंद घेऊ लागले. पण पापाचा घडा एकदा भरतोच.
यांना असे जेल मध्ये ठेवून यांची खातीरदारी करून यांना पोसण्यापेक्षा ह्या राक्षसांना जनतेच्या हवाली करा. ही असली विकृत जमात बियाला सुद्धा ठेवली नाही पाहिजे.. मा. अजित पवार साहेब तुम्ही हे फोटो कधीच पहिले असतील हे सगळं तुम्हाला कधीच माहित असेल परंतु नैतिकता नावाचा काहीतरी विषय असतो तो तुमच्याकडे नाहीच आहे, तेव्हा मागचं जाऊद्या पण असेल थोडीफार शिल्लक तर धनंजय मुंडेचा नुसता राजीनामा घेऊ नका तर त्यांना सुद्धा ह्या प्रकरणात सह आरोपी करा. पुरावे तुमच्याकडे आहेतच अजून पाहिजे असतील तर धस साहेब देतील..
असंही तुमचा पक्ष त्यांच्या वेगवेगळ्या लिलांनी कधीच बदनाम झालाय..
साहेब तो राक्षस स्व. संतोष देशमुख यांच्यावर नाही तर तुमच्या संपूर्ण व्यवस्थेवर मुतलाय, तो मुतलाय इथल्या पोलीस डिपार्मेंट वर, इथल्या गृह खात्यावर, इथल्या न्याय व्यवस्थेवर, इथल्या काय सुव्यवस्थेवर, धार मारलीये त्याने तुमच्या संपूर्ण व्यवस्थेवर कारण त्यांना माहितीये ही व्यवस्था काहींकांची रखेल झालीये..
हा उद्वेग माझा एकटीचा नाहीये तर हा उद्वेग महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील आक्रोश आहे. वेळीच हा आक्रोश शांत करा. नाहीतर येणार काळ तुमच्यासाठीही भयंकरच असणार आहे..
जयश्री पाटील, चाळीसगाव
0 टिप्पण्या